नाशिकरोडला वर्गणीच्या वादातून गोळीबार!
Nashik road shooting due to subscription dispute!
वेगवान नाशिक
नाशिकरोड,ता. 25 एप्रिल 2024 – Nashik news चाडगावमध्ये, काशाई देवीच्या यात्रेच्या पार्श्वमूमीवर, जेव्हा गावकरी एकत्र जमतात. यावेळी वार्षिक यात्रेसाठी जमा होणारा निधी आणि उरलेल्या आर्थिक ताळमेळसाठी चर्चा होते. तथापि, या चर्चेदरम्यान, बाचाबाची झाली. Nashik road shooting due to subscription dispute! आणि बेछुट गोळीबार झाल्याची घटना घडल्यामुळे नाशिक रोड परिसर हादरला आहे.
चाडेगांव विविध विकास सोसायटीचे सदस्य सचिन मानकर याने गावातील बंडु मानकर याच्यावर गोळीबार केला यात बंडु मानकर हा गंभीर जखमी झाला असून जखमी बंडु मानकर याच्यावर एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले
ओम साई ढाब्यावर पार्टी साठी बसले होते त्या ठिकाणी संशयित सचिन याने स्वतःकडे असलेल्या गावठी कट्टा मधून 2 गोळ्या जवळच्या मित्र नातेवाइक बंडु मानकर याच्यावर झाडल्या असून जखमी मानकर हा सिद्धिविनायक हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहे
याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास नाशिकरोड पोलीस करीत आहे
रविद्र पाटील हे गेल्या सात वर्षापासून सकाळ, लोकमत, दिव्य मराठी, या दैनिकात उपसंपादक म्हणून काम पाहत. 1 जानेवारी 2024 पासून वेगवान समुहाचे उपसंपादक म्हणून काम पाहत आहे. वेगवान नाशिक व वेगवान मराठी वेबपोर्टलसाठी उपसंपादक म्हणून काम करत आहे.