नाशिक शहर

गांधीगिरी पद्धतीने महिलांनी केला नाशिकचा हा बियरबार बंद

नेमकं नाशिकचा कोणता बियर बार केला बंद


वेगवान नाशिक / नितीन चव्हाण सिडको नाशिक, ता. २ में २०२४

वडाळा -पाथर्डी रस्त्यावर गुलमोहर नगर येथील महिलांनी गांधीगिरी करत येथे येणाऱ्या ग्राहकांना येथून निघून जाण्यास तर बार चालकाला सदर बार बंद करण्यास भाग पाडले. या भागातील शिवालिक सिग्मा इमारतीमध्ये गतवर्षी जून महिन्यात एका गाळ्यामध्ये हा बार आणि रेस्टॉरंट सुरू झाले होते.

त्यावेळी स्थानिकांनी विरोध केल्यामुळे तो बंद झाला होता अशी माहिती स्मृती नाईक यांनी दिली .मात्र गेल्या आठ दिवसांपासून पुन्हा एकदा हा बार सुरू झाल्याचे नागरिकांना कळल्यानंतर नागरिक संतप्त झाले .

नाशिक व्हॅाटसअप ग्रुपJoin
whatsapp channelJoin

रहिवासी परिसर असल्याने आणि जवळच पाथर्डी चे ग्रामदैवत म्हणून प्रसिद्ध असणारे सप्तशृंगी मंदिर देखील असल्याने हा विरोध वाढतच होता. या विरोधातून आज सायंकाळी सात वाजेच्या सुमारास श्रुती नाईक यांच्यासह द्वारका गोसावी, लता कमोद ,प्रगती सोनार, संध्या धुमाळ ,जयश्री शिंदे ,भाग्यश्री जाधव ,सुजाता चव्हाण, कल्याणी विसे, श्वेता पाटील ,सीमा डावखर आदींसह महिला आणि पुरुष लहान मुलांसह या ठिकाणी आले.

सर्वांनी गणपतीची आणि दुर्गेची आरती म्हणणे सुरू केले .त्यामुळे येथे असलेल्या ग्राहक देखील चक्रावले .आरती झाल्यानंतर या महिलांनी या बारला रहिवासी परिसर असल्याने आमचा विरोध आहे .

कृपया आपण येथून निघून जावे अशी विनंती ग्राहकांना केली त्यामुळे ग्राहक देखील येथे निघून गेले. नाहक वाद नको म्हणून संबंधित चालकाने देखील शटर बंद करून घेतले .दरम्यान बंद झालेला बार पुन्हा विरोधानंतर सुरू झालाच कसा असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे .

घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक शरमाळे आणि सहकार्यांनी येथे भेट दिली. दरम्यान पुन्हा हा बार सुरू झाला तर हे गांधीगिरी आंदोलन सुरूच राहील असा इशारा स्थानिक रहिवाशांनी दिला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!