नाशिक ग्रामीण

लासलगावचे लोक मतदानाला जाणारचं नाहीः आता काय झाल बुआ!


वेगवान नाशिक/ समिर पठाण

लासलगाव: ११ मे २०२४

गेल्या २०-२२ दिवसांपासून लासलगावला पाणीपुरवठा होत नसल्याने, लासलगाव शहरवासीयांकडुन आज लासलगाव शहर बंद ठेवण्यात आले असुन, मतदानावर ही बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

महाराष्ट्रावर वादळ व गारपीटचे संकट! हवामान विभागाचा अलर्ट जारी

सोळा गाव पाणीपुरवठा योजनेअंतर्गत 17 कोटी रुपये खर्च करून देखील 16 गाव पाणीपुरवठा योजनेतील पाईपलाईन दुरुस्त झाली नसल्याने, आज बंद पाळण्यात आला असून, मतदानावरही बहिष्कार टाकल्याची नागरीकांडुन माहिती मिळत आहे. पाणीपुरवठा योजनेतीची पाईपलाईन ही वारंवार लिकेज होत असल्याबाबतचा लासलगावकरांचा आरोप आहे.़

नाशिकः पाणी प्रश्न तापलाःअनेक महिला पुरुषांना पोलीसांनी घेतलं ताब्यात

या पार्श्वभूमीवर नागरिकांनी लोकसभा मतदानावर बहिष्कार व लासलगाव बंदची हाक दिल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले.लासलगाव ग्रामपंचायत कार्यालय मध्ये गटविकास अधिकारी आणि तहसीलदार यांनी बैठक घेतली यानंतर दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण च्या अधिकाऱ्यांनी बैठक घेतली मात्र या दोन्ही बैठकीत कुठलाही तोडगा न निघाल्याने समस्त लासलगावकरांनी बंदची हाक देत आपला रोष व्यक्त केला.

देवळ्यात भगरे की डॉ.पवार? कांदा, ड्रायपोर्ट, मोदी फॅक्टर काय ठरेल प्रभावी!

सोळा गाव पाणीपुरवठा समितीच्या ढिसाळ नियोजनामुळे सदर ठिकाणचे असलेले विज बिल हे वेळेत भरले जात नाही. त्यामुळे तेथील विजेपुरवठा खंडित केला जातो व त्याचा विपरीत परिणाम देखील नागरिकांना सहन करावा लागतो सदर समिती मार्फत पाण्याचे कुठल्याही प्रकारचे नियोजन न केल्यामुळे विकत पाणी प्यावे लागत असल्याचे म्हणणे लासलगावातील नागरीकांचे आहे.

महाराष्ट्रावर वादळ व गारपीटचे संकट! हवामान विभागाचा अलर्ट जारी

 प्रतिक्रिया –

पाणी टंचाई च्या निषेधार्थ मुख्य केंद्रिय निवडणूक आयोग व जिल्हाधिकारी नाशिक यांना इमेल द्वारा निवेदन देण्यात आले असुन, आम्ही सर्व लासलगावातील नागरिक मतदानावर बहिष्कार टाकत आहोत. चुकीच्या नियोजनाचा फटका हा लासलगाव व येथील रहिवाशांना बसत आहे याच्याच निषेधार्थ आम्ही निवडणूक आयोगाकडे पत्रव्यवहार करून मतदानावर बहिष्कार टाकला आहे.

 

संदिप उगले व राजेंद्र कराड- नागरीक (लासलगाव)


अरुण थोरे

अरुण थोरे  गेल्या 3 वर्षापासून वेगवान मिडीया मध्ये काम करत असुन,पत्रकारितेची सुरुवात वेगवान सहमुहातुन झाली. सध्या वेगवान नाशिक मध्ये प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. निफाड तालुक्यातून  शेती, राजकारण, क्राईम, विषयामध्ये चांगले ज्ञान असून शेतक-यांसाठी लेखन करण्याची आवड.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!