कळवण तालुक्यात एकाला लाच घेतांना पकडले
वेगवान नाशिक / गणेश जाधव
नाशिक, ता. 14 मार्च 2024 Kalwan news ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या प्रभाग समन्वयकाला १० हजारांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अभोणा पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
देविदास सयाजी चव्हाण (प्रभाग समन्वयक, महाराष्ट्र राज्य ग्रामीण उपजीविका अभियान, कळवण) असे लाच घेणा-याचे नाव आहे. 31 वर्षीय महिला फिर्यादीच्या तक्रारीनुसार, त्यांनी केलेल्या तीन महिन्यांच्या कामाचे 16 हजार 800 रुपये तक्रारदाराच्या बँक खात्यात जमा करण्यात आले. त्या बदल्यात लाच घेणा-याने 6 तारखेला स्वत:साठी आणि वरिष्ठांसाठी 4,800 रुपयांची लाच मागितली.
याप्रकरणी तक्रारदार महिलेने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. पडताळणीनंतर सोमवारी (ता. 11) कनाशी ग्रामपंचायतीच्या पाचा पांडव मंदिर हॉल, भक्त निवास येथे पथकाने लाच देणाऱ्याला रंगेहात पकडले. या प्रकरणी अभोणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.