नाशिक ग्रामीण

Rain Nashik रात्रभर पावसाचा धूमाकूळःवीजांचा कडकडाट, वादळ,गडगडाट!

Rain showers in Nashik district


वेगवान नाशिक

नाशिक, ता. 12 में 2024 –

( अजित देसाईंकडून )सिन्नर तालुक्यातील वावी येथे सकाळी आठ वाजल्यापासून पावसाला सुरुवात…. शनिवारी रात्रभर वादळाने धुमाकूळ घातला… विजांचा कडकडाट देखील मोठ्या प्रमाणात सुरू होता….. सिन्नर तालुक्याच्या विविध भागात पावसाने हजेरी लावली….. सिन्नर शहरासह तालुक्याचा बहुतांश भाग वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे मध्यरात्रीपर्यंत अंधारात होता.

नाशिक व्हॅाटसअप ग्रुपJoin
whatsapp channelJoin

 मान्सूची खबरः महाराष्ट्रात या तारखेला मान्सून दाखल होणार!

( प्रकाश शेळकेंकडून ) सिन्नर शिर्डी मार्गावर शनिवारी रात्री मोठ्या प्रमाणावर वादळी वाऱ्यामुळे झाड्यांच्या   फांदा मोडून पडल्या. पावसामुळे  ठिक  ठिकाणी पाणी साचले होते. नांदुर शिंगोटे: ग्रामीण भागात पहाटे तीन वाजेपर्यंत विद्युत पुरवठा खंडित होता. तीन वाजले नंतर विद्युत पुरवठा सुरळीत झाला. पहाटे पाच वाजता पुनश्च विद्युत पुरवठा खंडित झाला. शनिवारी सायंकाळी नांदूर शिंगोटे सह परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर मेकरजनेस अचानकपणे पावसाला सुरुवात झाली होती त्यानंतर रात्री मोठ्या प्रमाणावर विजांच्या कडकडाटासह वादळी वारे झाल्यामुळे परिसरामध्ये अनेक ठिकाणी विद्युत तारांवरती झाडे पडली त्यामुळे रात्री तीन वाजेपर्यंत विद्युत पुरवठा सर्वत्र खंडित झालेला होता रात्री तीन वाजता पुरवठा सुरू झाल्यानंतर पहाटे पाच ला विद्युत पुरवठा पुन्हा बंद झाला असून विद्युत पुरवठ्यावर अवलंबून असणारी व्यवसायिकांची सकाळी शांत बसल्याशिवाय पर्याय राहिला नाही विद्युत पुरवठ्यावर चालणारी सर्वच व्यवसाय टप्पा झाली असून सर्वत्र पावसाचे वातावरण असल्यामुळे वर्तुळक प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे शांतता दिसून येत आहे

ती जवळ येऊ देत नाही.. म्हणून त्याने तिचे तसे व्हिडीओ तिच्याच घरच्यांना पाठविले

( समीर जाधवकडून )चांदवड तालुक्यातील रात्री 8 वाजेपासून वादळी वा-यासह रिमझिम पावसाला सुरुवात झाली. रात्री 12 वाजनेंतर मात्र अनेक ठिकाणी जोरदार वादळ, पाऊस, ढगांचा गडगडाट सुरु झाला. आज सकाळी 8 वाजेंपर्यंत पाऊस ढगांचा गडगडाट सुरु आहे.

नाशिक जिल्ह्यात पुन्हा मुसळधार

(सोमानाथ घोंगाणेंकडून ) नांदगाव शहर व परिसरात रात्रीभर वादळाचा धुमाकूळ तसेच बहूतांश भागात पाऊस . नेहमीप्रेमाणे पाऊस चालू होताच वीजपुरवठा खंडीत संपूर्ण शहर रात्रभर अंधारात आजही दिवसभर वीज प्रवाह बंद राहणार .

( इम्ताईज खानकडून ) द्वारका नाशिक येथे काल संध्या. पासून पावसाला सुरुवात झाली. शनिवारी रात्रभर वादळाने धुमाकूळ घातला… विजांचा कडकडातासह पावसाने हजेरी लावली….. वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्यामुळे परिसरातील नागरिक वैतागले आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!