शेती

महाराष्ट्रावर वादळ व गारपीटचे संकट! हवामान विभागाचा अलर्ट जारी


वेगवान नाशिक / wegwan nashik

नाशिक,ता. 11 मे2024  – जिल्ह्यामध्ये काल वादळी वाऱ्यासह मुसळधार असा पाऊस झाला. मोठ्या प्रमाणात नाशिक जिल्ह्यामध्ये  नुकसान झालेला आहे. आज महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी ऑरेंज तर काही ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहेत. वादळी वारे  प्रमाणात वाहणार आहेत. वादळाचे संकट  नाशिक जिल्ह्यावरती आहे. आज हवामान खात्याने अलर्ट दिलेला आहे.

अजीत पवारांची राष्ट्रवादी सोडून आमदार नरहरी झिरवळांनी तुतारी फुंकली?

नाशिक व्हॅाटसअप ग्रुपJoin
whatsapp channelJoin

अर्ध्या महाराष्ट्रासाठी अर्लट देण्यात आला आहे जाणून घ्या आज कुठे कुठे पाऊस पडणार आहे आणि कुठे कुठे वादळ होणार आहे. दोन-तीन दिवस सलग महाराष्ट्र मध्ये पावसाचा अंदाज  हवामान खात्याने वर्तवलेला आहे.

देवळ्यात भगरे की डॉ.पवार? कांदा, ड्रायपोर्ट, मोदी फॅक्टर काय ठरेल प्रभावी!

पूर्व मौसमी सरी कोसळत आहे. तापमानात चढउतार होत आहेत. पुणे जिल्ह्यातील विविध भागात शनिवारी (ता. 11) मेघगर्जनेसह गारपिटीचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याने राज्यात वादळी पावसाचा इशारा दिला असून, ढग कायम राहण्याची शक्यता असून राज्याच्या इतर भागात हवामान उष्ण व दमट राहण्याची शक्यता आहे.

देवळालीत दिड तास वळवाच्या पावसाने झोडपले

राज्यात मान्सूनपूर्व ढग जमा झाले आहेत; शुक्रवारी सकाळपासून शनिवारी सकाळपर्यंत नागपूर, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, ब्रम्हपुरी, संभाजीनगर, नांदेड, धुळे आणि पुणे जिल्ह्यात हलका ते जोरदार पाऊस झाला. राज्यातील सर्वाधिक तापमान अकोल्यात ४३.२ अंश सेल्सिअस, तर मालेगाव, सोलापूर, धुळे येथे ४२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

चांदवड तालुक्यात वीज कोसळली! जिवित हानी ..

हवामान खात्याने आज राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. पुण्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता असून, ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. अहमदनगर, कोल्हापूर, सातारा, रायगड, रत्नागिरी, धुळे, नंदुरबार, नाशिक, सांगली, सोलापूर, संभाजीनगर, बीड, लातूर, धुळे, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

येवला तालुक्याला पावसाने झोडपले

दरम्यान, हवामान खात्याने पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील तीन दिवस (11, 12 आणि 13 मे) पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. नागपुरात पुढील ४ ते ५ दिवस जोरदार वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. बागांचेही मोठे नुकसान झाले आहे. हवामान खात्याने पुन्हा एकदा पावसाचा अंदाज वर्तवल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. राज्याच्या काही भागात गारपिटीचा इशाराही हवामान खात्याने दिला आहे.


रविंद्र पाटील

रविद्र पाटील हे गेल्या सात वर्षापासून  सकाळ, लोकमत, दिव्य मराठी,  या दैनिकात उपसंपादक म्हणून काम पाहत. 1 जानेवारी 2024 पासून वेगवान समुहाचे उपसंपादक म्हणून काम पाहत आहे. वेगवान नाशिक व वेगवान मराठी वेबपोर्टलसाठी उपसंपादक म्हणून काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!