नाशिकःमहिला एकटी असतांना तो घरात घुसला…
वेगवान नाशिक / Wegwan Nashik / Nashik News
नाशिक, 22 मार्च 2024ः सिडकोतील त्रिमुर्तीचौक भागात घरात घुसून शेजा-याने एका महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चैतन्य हर्षल कुलकर्णी (रा.वात्सल्य अपा. राधासोना नगर) असे संशयिताचे नाव आहे. पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार गेल्या ३० ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली.
महिला घरात एकटी असतांना संशयिताने वायफाय वापरण्याच्या बहाण्याने घरात प्रवेश करून महिलेचा विनयभंग केला. अधिक तपास हवालदार महाजन करीत आहेत.
वेगवान ऑनलाईनमध्ये मुख्यसंपादक म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, पुण्यनगरी, पुढारी,अॅग्रोवन, टीव्ही ९ मराठी, पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान नाशिक, इंडिया हिंदी न्यूज, बीजनेस बातम्यांचे संपादकीय म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम,शेती, उद्योग, खेळ,बीजनेस विषयातील बातम्यांमध्ये हातखंडा.