जे पी गावित म्हणतात….भारतीताई …
वेगवान नाशिक /
सुरगाणा, ता. 1 में 2024 – नाशिक जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेला दिंडोरी लोकसभा मतदार संघ कांदा प्रश्नांमुळे कमालीचा चर्चेत आला आहे. सबंध मतदार संघात कांदा, द्राक्ष आणि इतर बागायती पिकांबरोबर खरीप व रब्बी पिके पिकविणारा शेतकरी वारंवार संकटात सापडला आहे. कांदा निर्यातबंदी केल्याने लाखो टन कांदयाची नुकसान होत आहे, केंद्र शासन गुजरात राज्याला एक न्याय आणि देशातील इतर राज्यांना दुसरा न्याय अशा कपटी भूमिकेमुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.
बॅंकेने ओढून आणलेल्या नव्या गाड्यांची स्वस्तामध्ये विक्री Buy cars at low prices
बांगलादेश श्रीलंका या व इतर देशांचा विचार करायला शासनाकडे वेळ आहे मात्र महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी यांना दिसत नाही. शासनाच्या अनेक चुकीच्या धोरणांवर आवाज उठविण्यासाठी दिल्लीच्या संसदेत बसलेल्या आरोग्यमंत्री खासदार भारती पवार गेली पाच वर्ष मौन पाळून आहेत, नाफेड मधील घोटाळ्याने त्यांच्यावर मतदार ताशेरे ओढतांना दिसत आहेत, कांदा प्रश्र्नी पाच वर्ष एकही शब्द बोलल्या नाहीत, शेतकर्यांचे प्रश्न मांडले नाही, त्यामुळें संसदेत शेतकऱ्यांची बाजु घेणारे आणि संघर्ष करुण न्याय्य मिळवून देण्यासाठी जनतेने पुढाकार घेऊन संसदेत लढावू लोकप्रतिनिधींची निवड केली पाहिजे.
बॅंकेने ओढून आणलेल्या नव्या गाड्यांची स्वस्तामध्ये विक्री Buy cars at low prices
केंद्रात आरोग्य मंत्री पदाची जबाबदारी असतांना दिंडोरी लोकसभा मतदार संघात कुठेही आरोग्य व्यवस्था सुधारणा केली नाही, सरकारी दवाखान्याववर नियंत्रण नसल्याने सर्वत्र उदासीनता दिसते, दवाखान्यात मेडीसिन मिळत नाहीं, डॉक्टर व इतर स्टाफ उपलब्ध नाहीत, उपकरणांची व्यवस्था नाही, इमारतीची दुरावस्था अशा अनेक संकटांनी हा मतदार संघ चर्चेत असून भारती पवार यांना सरळसरळ या रोषांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळें लोकसभेचे खासदार आणि त्यांचे अधिकार काय असतात हे जनतेला दाखविण्यासाठी दिल्ली संसदेत संघर्ष करणार असल्याचे सांगितले.
दिंडोरी लोकसभा मतदार संघात अनेक पक्षाचे उमेदवार लढतील मात्र जनतेने लोकशाही पद्धतीने योग्य आणि लायक उमेदवाराला मतदान करणे गरजेचे आहे. उमेदवार जनतेसाठी काम करतोय का. काम करेल का, संसदेत संघर्ष करेल का, सामाजिक कार्याचा अनुभव आहे का, जनतेच्या प्रश्नाची तीव्रता ओळखता येते का, या बाबींचा मतदार बांधवांनी विचार करुन उमेदवार निवडणे काळाची गरज आहे.
बॅंकेने ओढून आणलेल्या नव्या गाड्यांची स्वस्तामध्ये विक्री Buy cars at low prices
दिंडोरी लोकसभा मतदार संघ हा आदिवासीं राखीव मतदार संघ असल्याने येथील आदिवासींच्या सर्वांगीण विकास करणाऱ्या आणि वैयक्तिक व सार्वजनिक प्रश्न सोडाविनाऱ्या खासदाराची मतदार संघाला गरज आहे, येथील कष्टकरी शेतकरी, आदिवासीं,- बिगर आदिवासी बांधव, शेतमजूर, कामगार, नोकरदार, महिला, युवक युवती यांच्या अडचणी सोडविणे गरजेचे आहे त्यामुळें शासनाच्या विविध योजना मिळवुन देणे, त्यांचे हक्क अधीकार मिळवून देणे गरजेचे आहे. सबंध मतदार संघाच्या विकासासाठी, जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी, वेळप्रसंगी शासनाशी दोन हात करण्याची हिम्मत उराशी बाळगूनच आपण दिल्लीच्या संसदेत संघर्ष करणार असल्याचे सांगितले.
कॉन्ट्रॅक्ट घेणारे तर तुम्हीच.
जयंत पाटील यांनी कॉन्ट्रॅक्ट कोणी कोणाकडून घेतले आहे याचे स्वतः आत्मपरीक्षण करावे….
बिनबुडाचे खोटे आरोप करण्याचे थांबवावे विनाकारण स्वतःची बाजू मांडण्याचे राजकारण करू नका माकपा हा पक्ष एकनिष्ठ आहे आणि एकनिष्ठ राहिल.तुमच्या पक्षाचे पदाधिकारी त्यांचे नातेवाईक कोणकोणत्या पक्षाचा प्रचार करतात याचे निरीक्षण करावे…
आम्हीं एकनिष्ठ आहोत आम्ही लाचार नव्हतो, नाहीं आणि नसणार….