नाशिक शहर
राजधानी, दुरांतोला वातानुकूलित डबा
वेगवान नाशिक
नाशिक रोड, ता. 27 मार्च 2024
मुंबई-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस आणि मुंबई-नागपूर दुरांतो एक्स्प्रेस कायमस्वरूपी एका अतिरिक्त वातानुकूलित तृतीय डब्यासह धावणार आहे. तत्पूर्वी ३१ मार्चपर्यंत या गाड्यांना तात्पुरत्या स्वरुपात अतिरिक्त वातानुकूलित तृतीय डब्बा जोडण्यात येणार आहे.
अतिरिक्त डब्यासह राजधानी एक्सप्रेसही गाडी (22221) मुंबई सीएसटीहून १ एप्रिलपासून पासून चालवण्यात येईल. गाडी क्रमांक 22222 हजरत निजामुद्दीन-मुंबई एक्स्प्रेस २ एप्रिलपासून चालवण्यात येईल. गाडी क्रमांक 12289 नागपूर- मुंबई दुरांतो एक्स्प्रेस १ एप्रिलपासून चालवण्यात येईल. गाडी क्रमांक 12290 मुंबई-नागपूर दुरांतो एक्सप्रेस २ एप्रिलपासून चालविण्यात येईल, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.
