नाशिक मनपाची प्रतीबंधीत प्लास्टिक वापरण्यावर धडक कारवाई.
वेगवान नाशिक
नाशिकरोड, ता. 27 मार्च 2024 राज्य शासनाने महाराष्ट्र प्लास्टिक व थर्मोकॉल अविघटनशील वस्तूंचे उत्पादन ,वापर ,हाताळणी व साठवणूक )अधिसूचना ,२०१८ च्या अमलबजावणीचे आदेश काढले होते.या आदेशानुसार एकल वापराच्या प्लास्टिकवर (सिंगल युज ) बंदी घातली आहे.
एकल वापराच्या प्लास्टिकवर असलेल्या बंदीबाबत शहरातील बसस्थानके ,रेल्वे स्थानके,बाजारपेठा,महत्वाचे रस्ते आदि ठिकाणी जनजागृती करणे कामी तसेच उल्लंघन करणारयांवर कारवाई करणेकामी नाशिक महानगरपालिकेत मनपा आयुक्त डॉ.अशोक करंजकर यांच्या आदेशाने वअतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे घनकचरा व्यवस्थापन विभाग संचालक डॉ.आवेश पलोड यांच्या मार्गदर्शनाखाली विभागनिहाय विशेष पथके तयार करण्यात आले .
सदर विशेष पथकांच्या मार्फत तपासनी करण्यात येऊन प्रतीबंधीत प्लास्टिक वापराबाबत एकूण 11 केसेस करण्यात येऊन ५५००० इतका दंड वसूल करण्यात आला.त्याचप्रमाणे विभागामार्फत प्लास्टिक वापराच्या बंदी बाबत जनजागृती करणेकामी शहरात फलक लावण्यात येणार आहे.