निफाड: पाचोरे येथील बेपत्ता मुलाचा आढळला विहीरीत मृतदेह
वेगवान नाशिक/ अरुण थोरे
मरळगोई/२९ मार्च २०२४
पाचोरे बु. ता. निफाड येथील काल दिनांक २९ मार्च संध्याकाळी ८ वा. पासुन घरातुन बेपत्ता असलेल्या मुलाचा विहीरीत मृतदेह सापडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
या बाबतची अधिक माहिती अशी, काल दिनांक २९ मार्च रोजी संध्याकाळी ८ वा घरातुन निघुन गेलेला प्रथमेश विलास हारगावकर (वय १७ वर्ष) याचा मृतदेह घरापासून काही अंतरावर असणार्या चुलत्याच्या विहीरीत दुपारी ४ च्या सुमारास सापडला असुन,
याबाबतची माहिती लासलगाव पोलीसांना मिळताच पोलिस नाईक लासुरकर व आदी घटनास्थळी पोहचुन मृतदेह उत्तरीय तपासणी साठी पाठवला असुन, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
अरुण थोरे गेल्या 3 वर्षापासून वेगवान मिडीया मध्ये काम करत असुन,पत्रकारितेची सुरुवात वेगवान सहमुहातुन झाली. सध्या वेगवान नाशिक मध्ये प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. निफाड तालुक्यातून शेती, राजकारण, क्राईम, विषयामध्ये चांगले ज्ञान असून शेतक-यांसाठी लेखन करण्याची आवड.