नाशिक क्राईमनाशिक ग्रामीण

ती जवळ येऊ देत नाही.. म्हणून त्याने तिचे तसे व्हिडीओ तिच्याच घरच्यांना पाठविले


वेगवान नाशिक

नाशिक, ता. 11 – शारीरिक जवळीक नाकारून प्रियकराने प्रेयसीची चारित्र्यहनन केल्याची घटना समोर आली आहे. प्रियकराने नातेवाइकांना अश्लील फोटो आणि व्हिडिओ पाठवल्याने हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले आहे. या घटनेमुळे पंचवटी पोलिस ठाण्यात छळवणूक आणि आयटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

महाराष्ट्रावर वादळ व गारपीटचे संकट! हवामान विभागाचा अलर्ट जारी

नाशिक व्हॅाटसअप ग्रुपJoin
whatsapp channelJoin

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुदाम पाटोळे असे संशयित प्रियकराचे नाव आहे. पेठरोडवरील समर्थ नगर परिसरात राहणाऱ्या तरुणीने फिर्याद दिली आहे. तिचे गेल्या वर्षभरापासून संशयिताशी प्रेमसंबंध होते. यावेळी तरुणाने वारंवार शारीरिक जवळीकीची मागणी केली, मात्र तरुणीने नकार दिल्याने ही घटना घडली.

लासलगावचे लोक मतदानाला जाणारचं नाहीः आता काय झाल बुआ!

या प्रेमप्रकरणात संशयिताने तरुणीचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ काढले होते. विनवणी करूनही मुलीने शारीरिक संपर्कास नकार दिल्यावर संतप्त झालेल्या संशयिताने फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली.

शुक्रवारी रात्री मुलीच्या नातेवाईकांच्या मोबाईलवर फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आणि पीडितेने तत्काळ पोलिसांकडे धाव घेतली. पुढील तपास निरीक्षक ज्योती आमने करीत आहेत.

देवळ्यात भगरे की डॉ.पवार? कांदा, ड्रायपोर्ट, मोदी फॅक्टर काय ठरेल प्रभावी!


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!