नाशिक शहर
देवळालीत दिड तास वळवाच्या पावसाने झोडपले

#WegwanNashik #वेगवान_नाशिक
देवळाली कॅम्प – देवळालीसह भगूर पंचक्रोशीत दुपारी चार वाजेच्या सुमारास विजेच्या गडगडात व वादळी वाऱ्यासह वळीव पाऊस पडला.
सायंकाळी चार वाजेच्या सुमारास अचानक ढगांचा गडगडाट व विजांच्या कडकडाट सुरू झाला त्या पाठोपाठ अवघ्या दहा मिनिटात पावसाच्या जोरदार सरींनी हजेरी लावली. अचानक आलेल्या या पावसाने तप्त वातावरणात काहीसा गारवा आला. मात्र वादळी पाऊस झाल्याने शहर परिसरात लावलेले विविध राजकीय बॅनरचे नुकसान झाले. आज अक्षय तृतीया असल्याने लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला अनेकांनी दुपारीच सुरुवात केली. मात्र अचानक आलेल्या पावसाने या कार्यकर्त्यांची देखील धांदल उडाल्याचे चित्र दिसून आले.अचानक वातावरण भरून आल्याने काही भागात शेतीचेही मोठे नुकसान झाल्याचे समजते.
