नाशिक ग्रामीण

चांदवड बस अपघात अपडेटः बस मधील प्रवाशांची यादी, पोलीसांचा व्हिडीओ पहा


वेगवान नाशिक / एकनाथ भालेराव 

चांदवड, ता. 30  एप्रिल 2024 – जळगाव कडून नाशिककडे जाणा-या बस उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून धडक दिल्याने बस मधील चार जण ठार झाले असून 23 जण गंभीर जखमी आहे. याबाबत पोलीसांचा अधिकृत बाईट पहा…

बॅंकेने ओढून आणलेल्या नव्या गाड्यांची स्वस्तामध्ये विक्री Buy cars at low prices

Realme सर्वात स्वस्त फोन 5G मोबाईल लॅान्च, सोबत 50 MP कॅमेरा

नाशिक व्हॅाटसअप ग्रुपJoin
नाशिक व्हॅाटस्अप चॅनलJoin

आज सकाळी 8 वाजेच्या सुमारास रेणुका देवी घाटच्या पुढे मालेगाव बाजूकडे रस्त्याच्या कडेला ट्रक उभी असतांना जळगाव कडून नाशिककडे जाणा-या बस ने ट्रकला पाठिमागून धडक देत डाव्या बाजून घासत गेल्याने बसमधील पाच प्रवासी ठार झाल्याची माहिती मिळत आहे.

नाशिकच्या जागेचा सुटता सुटेना तिढा, महायुतीच्या डोक्यात पडलायं किडा

बस मध्ये एकून 47 प्रवासी प्रवास करत होते. त्यात एक लहान मुलाचा समावेश आहे. अपघात झाल्यानंतर बस डाव्या बाजूने ट्रकला धडक दिल्याने बस मधील प्रवाशांना जबर मार लागला आहे.

Realme सर्वात स्वस्त फोन 5G मोबाईल लॅान्च, सोबत 50 MP कॅमेरा

पोलीस सुत्रांकडून जी माहिती प्राप्त झाली त्यामध्ये साई  देवरे रा. उमराणे  हा लहान मुलाचा मृत्यू झाला आहे. इतर लोकांची नावांची तपासणी पोलीस करत आहे. जळगाव वरुन वसई जाणारी बस प्रवाशांना विविध स्टॅापवरुन बसून उतरुन घेत होती.

सध्या जखमींना चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असून काही प्रवाशांना खासजी रुग्णालयात तर काहींना मालेगाव येथे नेण्यात आले आहे.

Realme सर्वात स्वस्त फोन 5G मोबाईल लॅान्च, सोबत 50 MP कॅमेरा

घटना स्थळावर अपघात झाल्यानंतर प्रचंड गोंधळ व अंगावर काटा आणणारी दृष्य दिसत असल्यामुळे प्रवाशी सुध्दा घाबरुन गेले होते. सध्या सोमा कंपनीचे कर्माचीर व चांदडव पोलीस तसेच नागरिकांच्या मदतीने जखमींना बाहेर काढण्यात आले..

 

पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार यादी जी आहे ते खालील प्रमाणे आहे.

कैलास रामदास देवरे, उमराणे, मयूर कैलास देवरे उमराणे, केमराबाई चव्हाण -डहाणू, रिना पवार -सौंदाणे, सुलोचना सुरेश चौधरी -पारोळा,  आशा रघुनाथ हिरे-पवन नगर नाशिक, सीमा दत्तू सोनवणे दहिवड, अरुण हरी ओतारी ,एरंडेल- ईश्वर गिघीप ओवतारी -एरंडेल, समाधान गोविंद देवरे उमराणा, धनसिंग बाबुराव पाटील जळगाव, सुरेश नदें, एंरडोल, मनस्वी महेश चव्हाण -नागझिरी, राणी महेश चव्हाण -नागझिरी, संतोष कृष्णराव गरवारे अकोला, संजय देवरे -उमराणे, मेठाबाई वाल्मीक पवार -जवळु,  राजेश मदन वाघ -अमळनेर, श्याम प्रभाकर शिरपुरे मालेगाव, एक अनओळखी स्त्री, वैशाली विश्वनाथ अहिरे अजंग वडेल -मालेगाव, बळीराम सोनू अहिरे नाशिक, शैलेश शिवाजी सूर्यवंशी मालेगाव ,वाल्मीक दत्तू पवार जळकू, लिलाबाई उखा पवार रामनगर, अंकुश उखा पवार रामनगर आदी प्रवसाी बस मधून प्रवास करत होते. 

Realme सर्वात स्वस्त फोन 5G मोबाईल लॅान्च, सोबत 50 MP कॅमेरा

मिडीयाकडे जी सुरुवातील माहिती प्राप्त झाली आहे त्यानुसार मयतांची आकडेवारी वाढून सांगितली जात होती. अनेक प्रवाशी शुध्दीत नसल्यामुळे हे आकडेवारी घटनास्थळावरुन वाढवून येत होती. मात्र आता पोलीसांनी अधिकृत मयत लोकांचे आकडेवारी जाहिर केली असून चार जण ठार झाल्याची माहिती आहे. 9 जण गंभीर जखमी आहे. तर 16 जण किरकोळ जखमी आहे.

Realme सर्वात स्वस्त फोन 5G मोबाईल लॅान्च, सोबत 50 MP कॅमेरा

मयत व्यक्तीची नावे

खालिदा गुलाम हुसेन ( वय. 60 )  रा. भोईवाडा ठाणे,

सुरेश तुकाराम सांवत (वय 28 )  – डोंगरगाव, ता. देवळा

साईल संजय देवरे ( वय 14 ) उमराणे  देवळा

बळीराम सोनू आहिरे ( वय 64 ) नाशिक

 

पोलीस काय सांगतात….बघा

 

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!