नाशिकः बायकोला प्रत्येक लग्न वाढदिवसाला त्याने सोनं खरेदी केलं…..पण…
वेगवान नाशिक
नाशिकरोड (प्रतिनिधी) दिनांक 30 मार्च 2024
लग्न झाले आणि तेव्हा पासून नवऱ्याने प्रत्येक वाढदिवसाला भेट दिलेले सुमारे 22तोळे दागिने चोरी गेले. मात्र उपनगर पोलिसांनी चोराला पकडले आणि चोरी गेलेले तेच सोने हस्तगत केले.
शिक्षका असलेल्या सुहासिनी विष्णू साने (वय 81) राहणार जगताप मळा, नाशिकरोड या साखरपुडाच्या कार्यक्रमाला मोलकरीन चंद्रभागा पाटील यांच्या सोबत गेल्य. जाताना मोलकरीन चंद्रभागा पाटील हिने नवऱ्याला घराची चावी दिली होती.घरात कोणी नसल्याची संधी साधून दत्तू साहेबराव पाटील याने घर उघडून कपाटातील सुमारे 22तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले.
उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शना खाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी, पोलीस शिपाई जयंत शिंदे,गौरव गवळी यांनी तांत्रिक विश्लेषण विभागाची मदत घेऊन संशयिताचा माग काढला. सहाय्यक निरीक्षक चौधरी, पोलीस हवालदार विनोद लखन, इम्रान शेख, अनिल शिंदे, संदेश रघतवान, पंकज कर्पे अश्या पाथकांनी जळगांव, चाळीसगाव येथील ओझर, टाकळी गाव येथून मोलकरीणचा नवरा दत्तू साहेबराव पाटील यास ताब्यात घेतले. त्याला खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. रामचंद्र कृष्णा पाटील (वय 62)पंचवटी नाशिक याच्या नावावर एका बँकेत चोरलेले सोने गहाण ठेवले व त्या मोबदल्यात रामचंद्र पाटील यास 51हजार रुपये दिले. या गुन्ह्यातील फिर्यादी सुहासिनी साने ह्या सेवानिवृत्त शिक्षका आहे. साने यांना चोरी गेलेले सोने हस्तगत केल्याचे समजताच माजी नगरसेवक रमेश धोंगडे यांच्या मदतीने त्या पोलीस ठाण्यात आल्या. उपायुक्त राऊत व पोनि सपकाळे सपोनि चौधरी यांचे आभार व्यक्त केले यावेळी त्यांचे डोळे पाणवले.या दोघा संशयिताना गुन्ह्यात अटक केली असून अधिक तपास सपोनि चौधरी करीत आहे.