नाशिक शहर

Rain Update नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रात या तारखेला विजांच्या कडकडाटासह पाऊस!

Rainfall in Nashik district on this date


वेगवान नाशिक /  Wegwan Nashik 

नाशिकः 3 एप्रिल 2024 – Rainfall in Nashik district on this date  राज्यात आज आणि उद्या उष्णतेच्या लाटेची चिंता कायम आहे. शनिवारी आणि रविवारी राज्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. Rain Update नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस हजेरी लावणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. 

खानदेश आणि लातूरचे धुळे, नंदुरबार, जळगाव आणि मराठवाड्यातील धुळे या जिल्ह्यांच्या काही भागात विजांच्या कडकडाटासह हलक्या सरींची शक्यता असल्याने एलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यावेळी ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहतील असाही अंदाज आहे.

नाशिक व्हॅाटसअप ग्रुपJoin
नाशिक व्हॅाटस्अप चॅनलJoin

याशिवाय सांगली, छत्रपती संभाजी नगर, बीड, नांदेड, यवतमाळ जिल्ह्यांतही हलक्या पावसाची शक्यता आहे. रविवारी राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. कोकणातील पालघर व ठाणे जिल्ह्यांसह खानदेशातील धुळे व जळगाव जिल्ह्यांसह नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, मराठवाडा, छत्रपती संभाजी नगर,

विदर्भातील जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धुळे आणि चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस पडण्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला आहे.

पाच एप्रिल पासून महाराष्ट्रात पावसाचा अंदाज असून 6 एप्रिल पासून नाशिक जिल्ह्यासह काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार आहे.


Sahebrao Thakare

वेगवान ऑनलाईनमध्ये मुख्यसंपादक म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, पुण्यनगरी, पुढारी,अॅग्रोवन, टीव्ही ९ मराठी, पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान नाशिक, इंडिया हिंदी न्यूज, बीजनेस बातम्यांचे संपादकीय म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम,शेती, उद्योग, खेळ,बीजनेस विषयातील बातम्यांमध्ये हातखंडा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!