नाशिकः कुस्तीपटूवर बंदुकीतून चार गोळ्या झाडल्या…
नाशिकः कुस्तीपटूवर बंदुकीतून चार गोळ्या झाडल्या...
वेगवान नाशिक
इगतपुरी, ता. 10- भर रस्त्यात तरुणाचा कोयत्याने वार करत आणि बंदुकीतून गोळ्या झाडत खून करण्यात आल्याची घटना तालुक्यातील सांजेगाव येथील घडली आहे. ऐन अक्षय तृतीयेच्या दिवशीच ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. चुलत भावानेच गोळ्या झाडल्याची प्राथमिक माहिती आहे.
अजीत पवारांची राष्ट्रवादी सोडून आमदार नरहरी झिरवळांनी तुतारी फुंकली?
भुषण लहामगे असे दुर्दैवी युवकाचे नाव असून तो जिल्हा स्तरीय कुस्तीपटू असल्याचे समजते. मुंबई आग्रा महामार्गावर राजूर फाटा येथे ही घटना झाली आहे.
छगन भुजबळ हे शरद पवारांच्या तुतारीचे काम करतात… video
युवकाची हत्या करून अज्ञात मारेकरी फरार झाले आहेत. वाडीवहे आणि ग्रामीण पोलीस दल घटनास्थळी दाखल झाले आहे. मारेकऱ्यांचा पोलीस कसून शोध घेत आहे. कोयत्याने वार आणि गोळी घालून ही हत्या झाल्याचे समजते. बंदुकीचे तीन चार राऊंड फायर झाले असल्याची या भागात चर्चा आहे.
दिंडोरीच्या केंद्रीय मंत्री भारतीताई रडल्या…