नाशिकचे राजकारण

अजीत पवारांची राष्ट्रवादी सोडून आमदार नरहरी झिरवळांनी तुतारी फुंकली?


वेगवान नाशिक / 

नाशिक, ता. 10 में 2024  – सध्या लोकसभेची निवडणूक  एैन रंगात आलेली आहे. सर्व ठिकाणी प्रचार सुरू झालेले आहेत. राष्ट्रवादी दोन ठिकाणी फुटलेले आहेत. तर शिवसेना ही दोन ठिकाणी फुटलेले आहेत. मात्र एकजूट आहे ती भाजप, भाजप न कधी फुटलं न फुटणार आहे. अशी परिस्थिती तरी सध्या महाराष्ट्र आणि देशामध्ये आहे. मात्र राष्ट्रवादीमध्ये जो कलगीतुरा चाललेला आहे तो कलगी तुरा पाहण्यासारखाच आहे.

संजय राऊत यांच्या या वक्तव्यामुळे:, नाशिकच्या या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

नाशिक व्हॅाटसअप ग्रुपJoin
whatsapp channelJoin

राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडले आहे, एक गट अजित पवार आणि एक गट शरद पवार यांचा आहे. नरहरी जिरवाळ हे अजित पवार गटाबरोबर गेलेले आहेत. मात्र सध्या एक छायाचित्र व्हायरल होत  आहे.  त्या छायाचित्रानुसार सर्व ठिकाणी अशी चर्चा होताना दिसते आहे की राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ हे  अजित पवार यांना सोडून शरद पवार यांच्या गटामध्ये सहभागी झालेले आहेत. असं एक छायाचित्र सध्या दिंडोरी मतदारसंघ आणि सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

छगन भुजबळ हे शरद पवारांच्या तुतारीचे काम करतात… video

दिंडोरी तालुक्यातील मतदार म्हणतात की आम्ही शरदचंद्र पवार यांच्या गटाच्या बाजूने आहेत. येत्या काही दिवसांमध्ये राष्ट्रवादीच्या  अजित पवारांच्या गटामध्ये गेलेले आमदार नरहर झिरवळ हे सुद्धा हातामध्ये तुतारी पकडणार आहे.  यात कुठलीही शंका नाही असं मतदारांच्या तोंडून ऐकायला मिळत आहे.  मात्र एकंदरीत पुढचं काही असलं तरी सध्या जे सुरू आहे. त्यानुसार नररी झिरवळ हे मात्र अजित पवार यांना सोडून आलेले नाही ते सध्या अजित पवार यांच्या गटामध्येच आहे. सध्या त्यांची निशाणी घड्याळ हीच आहे.

दिंडोरीच्या केंद्रीय मंत्री भारतीताई रडल्या…

दिंडोरी तालुक्यामध्ये तिसगाव येथे मारुती मंदिराचे भूमीपुजन होते आणि याच दरम्यान नरहरी झिरवळ हे त्या ठिकाणी आले होते.   त्या ठिकाणी शरदचंद्र पवार गटाच्या लोकसभेचे उमेदवार भास्कर भगरे यांची प्रचार सभा सुरू होती. आणि याचवेळी नरहरी झिरवळ यांचं त्या ठिकाणी आगमन झालं. त्यामुळे तेथील स्थानिक माणसांनी एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना आपल्यामध्ये येऊन बसण्याचा आग्रह धरला.

Rain Nashikनाशिक जिल्ह्याला दुस-या दिवशी पावसाने झोडपलं.. video

यामुळे झिरवळ यांना त्या व्यासपीठावर येऊन बसावे लागले.  आपण सगळे एकच आहे असं म्हणून ते या उमेदवाराच्या व्यासपीठावरती येऊन बसले.  याच दरम्यान त्यांचे फोटो वातावरण निर्मीतीसाठी जाणिव पूर्वक व्हायरलं करण्यात आले आहे. झिरवळ अजीत पवार यांच्या सोबत असून ते भारतीताई पवार यांचाचं  प्रचार करत आहे.

दिंडोरी तालुक्यातील स्थानिक माणूस भास्कर भगरे हे उभे आहे त्यामुळे तालुक्यातील मतदार हे तुतारी मागे राहणे स्वाभिविक आहे. सध्या झिरवळ हे भाजपाला सोडून येऊ शकतं नाही.  विधानसभेच्या वेळी मात्र सगळ्यांची गोची होणार आहे. त्यावेळी मात्र कोण कुठ उड्या मारतं हे पाहणे योग्य ठरणार आहे.  भाजपाच्या जास्त जागा आल्या तर झिरवळ  अजीत पवारांबरोबर जाऊन यशस्वी झाले…असा अर्थ काढल्या जाणार आहे.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!