नाशिक ग्रामीण

नाशिकः तृतीय पंथीचे लाखो रुपये लंपास करणारे महिलेसह सहा आरोपी पोलीसांच्या ताब्यात

Nashik Sinner News सिन्नर तालुक्यातील  वावी पोलिस ठाणे हद्दीतील पाथरे बु. ता. सिन्नर जि.नाशिक राहणारे मयुरेश निवृत्ती काळे, वय २३ यांच्या राहत्या घरातुन दिनांक ३१ मार्च २०२४ रोजी दुपारी बंद घराचा कडी कोयंडा तोडुन लाखो रूपयांचा मुद्देमाल चोरी गेल्याची घटना घडली.


वेगवान नाशिक / wegwan Nashik  

अरुण थोरे 

सिन्नर, ता. 4 एप्रिल 2024 – Sinner News  तृतीय पंथी यांच्या ओळखीचा गैर फायदा घेत त्यांना मिळालेल्या दान, सोनं,चांदी व पैशावर डोळा ठेवणा-या महिलेसह 6 आरोपींना नाशिक ग्रामीण पोलीसांनी सापळा रचून अटक केली आहे. यामध्ये या आरोपींनी धाडसी चोरू करुन लाखो रुपयांचा ऐवजा चोरी केला होता.

सिन्नर तालुक्यातील  वावी पोलिस ठाणे हद्दीतील पाथरे बु. ता. सिन्नर जि.नाशिक राहणारे मयुरेश निवृत्ती काळे, वय २३ यांच्या राहत्या घरातुन दिनांक ३१ मार्च २०२४ रोजी दुपारी बंद घराचा कडी कोयंडा तोडुन लाखो रूपयांचा मुद्देमाल चोरी गेल्याची घटना घडली. याबाबत वावी पोलिसात गुरनं १४२/२०२४ भांदवी कलम४५४,३८०, अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

सदर गुन्हयाच्या समांतर तपासात स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार पोकॉ विनोद टिळे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून केलेल्या तांत्रिक तपासात खालील आरोपींचा सहभाग व गुन्हा बाबत सखोल माहिती मिळाली आहे.

१) सुनील शंकर म्हस्के, वय ३१, रा. साबरवाडी, ता. येवला, जि. नाशिक

२) चांगदेव भागीनाथ देवडे, वय ३५, रा. बदापुर, ता. येवला, जि. नाशिक

३) कैलास शिवाजी मढवई, वय ३४, रा. चिचोंडी, ता. येवला, जि. नाशिक

४) अकरम कमरूद्दीन शेख, वय ३१, रा. विंचुर रोड, येवला, ता. येवला, जि. नाशिक ५) जीवन वाल्मीक कोल्हे, वय २६, रा. हडप सावरगाव, ता. येवला, जि. नाशिक

६) अलका दिपक जेजुरकर, वय ४८, रा. येवला, ता. येवला, जि. नाशिक

याबाबतची वावी पोलीसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, फिर्यादी मयुरेश निवृत्ती काळे हा तृतीयपंथी असुन, त्याचा घरी देवीची नियमीत पुजा विधी केला जातो, पुजा विधीच्या निमित्ताने आरोपी अलका दिपक जेजुरकर (वय ४८) व इतर सहा आरोपी यांचे फिर्यादी मयुरेश यांच्या घरी नेहमी येणे-जाणे असल्याने आरोपी अलका हीस मयुरेश यांच्या जवळील रक्कम व देवीच्या अंगावरील दागिन्यांची माहिती होती .याचाच फायदा घेत आरोपी अलका व इतर ५ जणांनी कट रचला व मयुरेश याला‌ घटनेच्या दिवशी खरेदीच्या निमित्ताने आरोपी क्रं १ व ६ यांनी शिर्डी येथे नेले, व आरोपी क्रं. २ ते ५ यांनी घराची टेहाळणी करुन दरवाज्याचा कडी कोयंडा उचकाटुन, घरात प्रवेश करत कपाटातील रोख रक्कम व देवीच्या अंगावरील दागिने असा लाखों रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरी केला. याबाबत गोपनीय माहिती च्या आधारे गुन्ह्याची उकल झाल्याने तपासा कामी आरोपींना वावी पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले.

वरील नमुद आरोपींकडून गुन्हयात चोरून नेलेले रोख रक्कमेतील १४ लाख ७ हजार रूपये, गुन्हयात चोरीस गेलेले सर्व दागिने व चोरीचे पैशातुन खरेदी केलेला ७ हजार रूपये किंमतीचा मोबाईल फोन तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेली मारूती इर्टिगा कार क. एच.एच.०४.ई.टी. ७८९५ व इर्टीगा कार क. एम. एच.१४.क्यु.एक्स.४३९९ अशा दोन चारचाकी असा एकुण २५ लाख रू. किंमतीचा मु‌द्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.

नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक श्री. आदित्य

मिरखेलकर व उपविभागीय पोलीस अधिकारी निफाड विभाग श्री. निलेश पालवे यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. राजु सुर्वे, सपोनि गणेश शिंदे, पोउनि दत्ता कांभीरे, पोउनि नाना शिरोळे, पोलीस अंमलदार नवनाथ सानप, विश्वनाथ काकड, विनोद टिळे, मेघराज जाधव, उदय पाठक, संदिप नागपुरे, हेमंत गरूड, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम, गिरीष बागुल, चालक विकी म्हसदे, महिला पोलीस अंमलदार योगिता काकड, छाया गायकवाड, अस्मिता मढवई यांचे पथकाने वरील आरोपींना ताब्यात घेवून गुन्हा उघडकीस आणलेला आहे.


Sahebrao Thakare

वेगवान ऑनलाईनमध्ये मुख्यसंपादक म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, पुण्यनगरी, पुढारी,अॅग्रोवन, टीव्ही ९ मराठी, पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान नाशिक, इंडिया हिंदी न्यूज, बीजनेस बातम्यांचे संपादकीय म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम,शेती, उद्योग, खेळ,बीजनेस विषयातील बातम्यांमध्ये हातखंडा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!