नाशिक शहर

श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा ….


वेगवान नाशिक / पराग बच्छाव

सिडको नवीन नाशिक, ता. १७ एप्रिल २०२४ –

श्रीराम मंदिर धर्मदाय ट्रस्ट आयोजित श्रीराम जन्मोत्सव २०२४ विविध धार्मिक कार्यक्रमसह मोठ्या भक्तिमय वातावरणात पाडला.

नाशिक व्हॅाटसअप ग्रुपJoin
whatsapp channelJoin

सकाळी ७ वाजता प्रभू श्रीरामांचा महा अभिषेक व महापूजा करण्यात आले तसेच १० वाजता ह .भ .प .श्री राजेंद्र महाराज राजपूत यांचे जाहीर प्रवचन व ठीक १२ वाजता श्रीराम जन्मोत्सव सोहळा या ठिकाणी संपन्न झाला..या वेळी राजकीय सामाजिक व शैक्षणिक अशा सर्व क्षेत्रातील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. परिसरातील महिला व सर्व रामभक्तांनी प्रभू श्रीरामांचा पाळणा झूलवून श्रीराम जन्मोत्सवाचा सोहळा अनुभवला.

 

सायंकाळी सुरसंगम म्युझिकल ग्रुप यांचा भक्तिसंगतेचा कार्यक्रम बरोबर महाप्रसादाचा लोकांनी आस्वाद घेत रामलल्ला यांच्या नावात रंगून गेले .

 

तसेच अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ठाकूर साहेब यांच्या हस्ते सायंकाळी ८ वाजता महाआरती करण्यात आली. त्याचबरोबर महामंडलेश्वर शांतिगिरी महाराज यांनी देखील प्रभू रामचंद्रांचे दर्शन घेतले …श्री राम जय राम जय जय राम या जय घोषाल संपूर्ण परिसर दंगुन गेला होता या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीराम मंदिर धर्मादाय ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष जिभाऊ बच्छाव अध्यक्ष प्रवीण गुरव, सचिन पाटील ,, विश्वनाथ नेरकर, रमेश देवरे, सुभाष बडगुजर, एकनाथ जाधव, आदीसह श्रीराम युवा मित्र मंडळ श्रीराम महिला मित्र मंडळ यांनी अथक परिश्रम घेतले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!