त्या हिरो सोबत मी रोमान्स करु शकत नाही- करीना कपूर ने दिला नकार
I can't romance with that hero - Kareena Kapoor refused
वेगवान नाशिक
मुंबई, 22 मार्च 2024 – अभिनेत्री करीना कपूरने चित्रपटसृष्टीत २४ वर्षे पूर्ण केली आहेत. तिने आतापर्यंतच्या कारकिर्दीत अनेक दमदार भूमिका साकारल्या आहेत. मात्र, सुरुवातीच्या काळात तिच्या अभिनयाला प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. अनुभवाच्या जोरावर तिने तिच्या कामात काही बदल केले.
करिनाने ‘रिफ्युजी’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यामध्ये ती अभिनेता अभिषेक बच्चनसोबत मुख्य भूमिकेत होती. या दोघांचा हा पहिलाच चित्रपट होता. ‘रिफ्युजी’मध्ये करीना आणि अभिषेकची प्रेमकथा दाखवण्यात आली होती. मात्र, शूटिंगदरम्यान करिनाने थेट अभिषेकसोबत रोमँटिक सीन करण्यास नकार दिला.
सिमी गरेवालच्या चॅट शोमध्ये करिनाने या घटनेचा खुलासा केला. शोमध्ये सिमीने अभिषेक बच्चनला व्हिडिओ कॉलद्वारे कॉल केला होता. त्यावेळी अभिषेकने सांगितले की, तो त्याच्या पहिल्या चित्रपटातील रोमँटिक सीन कधीच विसरू शकत नाही कारण करीनाने तो सीन करण्यास नकार दिला होता.
अभिषेक पुढे म्हणाला की, शूटिंगदरम्यान जेव्हा दिग्दर्शकांनी करीनाला रोमँटिक सीनबद्दल माहिती दिली तेव्हा तिने असे सांगून नकार दिला, “हे कसे होऊ शकते? तो माझ्या भावासारखा आहे. मी त्याच्यासोबत रोमान्स कसा करू?”
करीना आणि अभिषेकचा पहिला चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. मात्र, या चित्रपटातील भूमिकेसाठी करिनाला सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. सध्या करीना तिच्या आगामी ‘क्रू’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यामध्ये ती कृती सेनन आणि तब्बूसोबत भूमिका साकारताना दिसणार आहे.
वेगवान ऑनलाईनमध्ये मुख्यसंपादक म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, पुण्यनगरी, पुढारी,अॅग्रोवन, टीव्ही ९ मराठी, पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान नाशिक, इंडिया हिंदी न्यूज, बीजनेस बातम्यांचे संपादकीय म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम,शेती, उद्योग, खेळ,बीजनेस विषयातील बातम्यांमध्ये हातखंडा.