नाशिकचे राजकारण

छगन भुजबळांचे कर्ज माफ झालं, आता तुमचंही होणार?


वेगवान नाशिक /  wegwan nashik

चांदवड,दि 7 एप्रिल 2024  राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री राष्ट्रवादीचे हेविवेट नेते छगन भुजबळ यांना जिल्हा बँकेच्या थकबाकी प्रकरणात जिल्हा बँकेने नवीन सामोपचार कर्ज परतफेड योजनेत भुजबळांना निम्मे कर्ज माफ केले. व उर्वरित कर्जाचे चार हप्ते करून दिले. जर भुजबळांचे कर्ज माफ झाले तर तुमचेही कर्ज माफ व्हायला पाहिजेत असं म्हटलं वावगे ठरणार नाही. कारण नियम देशात सर्वांना सारखाचा आहे. Chhagan Bhujbal’s loan was waived off, now will yours be too?

तरीही अशाच पद्धतीचे आमचेही निम्मे कर्ज  माफ करावे. यासाठी चांदवड तालुक्यातील पाटे कोलटेक विविध कार्यकारी सोसायटीच्या सभासदांनी सोसायटीच्या सचिवांना निवेदन दिले. निवेदनाचा विचार न केल्यास मोर्चा आंदोलनाचाही इशारा दिला.

नाशिक व्हॅाटसअप ग्रुपJoin
whatsapp channelJoin

नाशिक लोकसभा मतदारसंघातून छगन भुजबळ यांना महायुतीकडून लोकसभेसाठी उभे केली जाण्याची शक्यता असल्याने, भुजबळ यांनी उमेदवारीसाठी कर्ज थकबाकीचा अडसर नको म्हणून त्यांच्या मालकीच्या मालेगाव तालुक्यातील दाभाडी येथील आर्मस्ट्रांग इनफ्रास्ट्रक्चर कंपनीचे जिल्हा बँकेचे थकीत कर्ज 31 मार्चला भरले.

परंतु यामध्ये जिल्हा बँकेने भुजबळ यांना सामोपचार कर्ज परतफेड योजनेचा लाभ देऊन निम्मे कर्ज माफ केल्याच्या बातम्या विविध प्रसारमाध्यमात प्रसिद्ध झाल्या. याच बातम्यांच्या आधारे पाटे कोलटेक येथील सोसायटीच्या सभासदांनी भुजबळांप्रमाणेच आमचेही निम्मे थकीत कर्ज माफ करावे व आम्हालाही भुजबळांप्रमाणे उर्वरित रक्कम भरण्यासाठी चार हप्ते करून द्यावे. अशी मागणी निवेदनाद्वारे सचिवांकडे केली आहे.

मुळात जिल्हा बँकेकडून विविध प्रकारचे कर्ज शेतकऱ्यांना दिली जातात, मात्र शेतकऱ्यांना उत्पन्न होवो ना होवो शेतीमालाला भाव असो वा नसो. नैसर्गिक आपत्तीत नुकसान झाले तरीही शेतकऱ्यांना कर्ज भरावीच लागतात. त्यांना कोणत्याही प्रकारची माफी दिली जात नाही. याउलट बड्या बड्या धेंडांना जिल्हा बँकेकडूनही कर्ज दिली जातात. मात्र हे बडे धेंडे कोट्यावधींचे मालक असतानाही जिल्हा बँकेची मोठ-मोठे कर्ज थकावतात.

यामुळे बँक आर्थिक अडचणीत येते. याचा थेट फटका सामान्य शेतकरी कष्टकरी, गोरगरीब, मजूर यांना बसतो. 2016 पासून जिल्हा बँकेकडे असणाऱ्या गोरगरिबांच्या अगदी माफक ठेवी सुद्धा त्यांना मिळत नाही.शेतक-यांनाही पुरेसे कर्ज  मिळत नाही.तर दुसरीकडे अशा प्रकारच्या मोठमोठ्या कर्ज थकबाकीच्या रकमा जिल्हा बँक कशी काय माफ करू शकते ?

हा  विषय जिल्हाभर सध्या भुजबळांच्या रूपानें चर्चिला जात आहे. निवेदनावर अजय ठोके साहेबराव चव्हाण रवींद्र खांगळ सोपान खांगळ कैलास खामंगळ योगेश खांगळ सागर खांदळ अण्णासाहेब ठोके यशवंत तळेकर खंडू ठोके अनिल खांदळ सुनंदा ठोके उत्तम ठोके श्रावण ठोके भागवत ठोके भीमा झाल्टे वाल्मीक ठोके ज्ञानेश्वर ठोके बाळकृष्ण चव्हाण राजेंद्र निंबाळकर शिवाजी निंबाळकर भास्कर जाधव आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!