नाशिक शहर

नाशिकः पहिल्याच दिवशी दोन्ही मतदारसंघात एकूण तीन अर्ज दाखल


नाशिकः दिनांक 26 एप्रिल 2024.लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता नाशिक जिल्ह्यात नामनिर्देशनपत्र सादर करण्याच्या पहिल्याच दिवशी दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी २ तर नाशिक मतदार संघासाठी १ असे एकूण ३ नामनिर्देशनपत्र दाखल झाले.

२० दिंडोरी लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांच्या दालनात माजी आमदार जे. पी. गावित व सुभाष रामु चौधरी यांनी (कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी)) यांनी लोकसभा निवडणुकीसाठी 20 दिंडोरी मतदारसंघातून नामनिर्देशनपत्र सादर केले.

तर नाशिक लोकसभा मतदार संघातून जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी जलज शर्मा यांच्या दालनात शांतिगिरीजी महाराज (अपक्ष) यांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले.

नाशिक व्हॅाटसअप ग्रुपJoin
नाशिक व्हॅाटस्अप चॅनलJoin


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!