लोकसभा निवडणूकीत शेत-यांना गाजर…कांदा निर्यातीला केंद्राची परवानगी Onion Export open
वेगवान नाशिक ने सकाळी याबाबत वृत्त प्रसिध्द केले होते की कांदा उत्पादक शेतकरी केंद्राचे काय वाकडे करणार..यावर लगेच केंद्राने दखल घेत कांदा निर्यात बंदी उठविण्याची घोषणा केली.
वेगवान नाशिक / रविंद्र पाटील
मुंबई, ता. 27 एप्रिल 2024 -वेगवान नाशिक ने सकाळी याबाबत वृत्त प्रसिध्द केले होते की कांदा उत्पादक शेतकरी केंद्राचे काय वाकडे करणार..यावर लगेच केंद्राने दखल घेत कांदा निर्यात बंदी उठविण्याची घोषणा केली. केंद्र सरकार पर्य़ंत बातम्या जातात मात्र त्यासाठी त्यांनी तसे लोक पेरुन ठेवले आहे. मात्र हेच काम लवकर केल्यास शेतक-यांना निश्चित आंनद होईल
कांदा उत्पादक केंद्राचे काय वाकडे करणार ? Onion export
गुजरातमधील कांदा निर्यातीस परवानगी दिल्यावरुन केंद्र सरकारवर टीका सुरु आहे. परंतु आता केंद्र सरकारने कांदा उत्पादकांसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे.
बांगलादेश, श्रीलंका, भुतान, बहरैन, युएई आणि मॉरिशस सहा देशांमध्ये कांदा निर्यात केली जाणार आहे. एकूण ९९ हजार १५० मेट्रीक टन कांदा निर्यातीस परवानगी केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरु असताना कांदा उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र शासनाने दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.
शेतकऱ्यांची होती मागणी
केंद्र सरकारने राजस्थान, मध्यप्रदेश, तेलंगाना, छत्तीसगड आणि मिझोरम राज्यांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कांदा निर्यातबंदी मागील वर्षी केली होती. सुरुवातीला ही निर्यात बंदी मार्च २०२४ पर्यंत होती. परंतु त्यानंतर सरकारने कांदा निर्यातबंदी वाढवली. यामुळे देशांतर्गत बाजारपेठांमध्ये शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला दर मिळत नाही. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी त्यासाठी आंदोलने केली. देशात सर्वाधिक कांद्याचे उत्पादन होत असलेल्या नाशिकमध्ये शेतकरी वारंवार कांदा निर्यात बंदी मागे घेण्याची मागणी करत होते.
रविद्र पाटील हे गेल्या सात वर्षापासून सकाळ, लोकमत, दिव्य मराठी, या दैनिकात उपसंपादक म्हणून काम पाहत. 1 जानेवारी 2024 पासून वेगवान समुहाचे उपसंपादक म्हणून काम पाहत आहे. वेगवान नाशिक व वेगवान मराठी वेबपोर्टलसाठी उपसंपादक म्हणून काम करत आहे.