नाशिकः पोलीस हवालदारासह महिला पोलीस अपघातामध्ये ठार
वेगवान नाशिक / आॅनलाईन डेक्स
दिंडोरी, ता. 24 एप्रिल 2024 – वणी-नाशिक महामार्गावर भरधाव वेगात आलेल्या काळ्या-पिवळ्या मॅक्स कारची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या दु:खद घटनेत एका पोलीस हवालदारासह महिला पोलीस कर्मचाऱ्याला आपला जीव गमवावा लागला.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी (दि. 23) रात्री 9 च्या दरम्यान घडली. वणी-नाशिक महामार्गावरील ओझरखेड शिवारातील हॉटेल श्रीहरीजवळ. मृत दोघेही नाशिक पोलीस आयुक्त कार्यालयातील मोटार वाहतूक विभागात कर्मचारी होते. याप्रकरणी वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर नामदेव राऊंडल (वय 52 वर्षे, दोघे रा. नाशिक पोलीस आयुक्तालय कॉलनी) आणि रेणुका भिकाजी कदम (वय 46) अशी मृतांची ओळख पटली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर राऊंडल यांची पोलिस आयुक्त कार्यालयातील मोटार वाहतूक विभागात तंत्रज्ञ म्हणून, तर रेणुका कदम यांची त्याच विभागात तांत्रिक सहायक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. दोघेही मंगळवारी रात्री वारणा कारने (एमएच १५-डीएम ९१८३) नाशिकच्या दिशेने परतत होते. ओझरखेड शिवारात वणी-दिंडोरी रस्त्यावरील हॉटेल श्रीहरीजवळ कार पोहोचली. तेवढ्यात विरुद्ध दिशेकडून भरधाव वेगात असलेली महिंद्रा कंपनीची मॅक्स काळी-पिवळी जीप आली. नियंत्रण सुटल्याने जीप कारला जोरात धडकली.
या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच वणी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दोघांनाही वणी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले.
याप्रकरणी वणीचे पोलीस निरीक्षक मुजम्मील उस्मान देशमुख यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार वणी पोलिसांनी जीपचालक अरुण रामचंद्र गायकवाड (रा. ओझरखेड, जि. दिंडोरी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. राऊंडल यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी आहे. कदम यांच्या कुटुंबात त्यांचे पती आणि एका मुलाचा समावेश आहे. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने नाशिक शहर पोलीस दलात शोककळा पसरली आहे.
रविद्र पाटील हे गेल्या सात वर्षापासून सकाळ, लोकमत, दिव्य मराठी, या दैनिकात उपसंपादक म्हणून काम पाहत. 1 जानेवारी 2024 पासून वेगवान समुहाचे उपसंपादक म्हणून काम पाहत आहे. वेगवान नाशिक व वेगवान मराठी वेबपोर्टलसाठी उपसंपादक म्हणून काम करत आहे.