नाशिक ग्रामीण

पालखेड डाव्या कालव्याला पाणी सुटणार

Palkhed left canal will release water


वेगवान नाशिक

नाशिकः 23 मार्च 2024 – Palkhed left canal will release water चालू वर्षी दुष्काळसदृश परिस्थिती, धरणांमध्ये अत्यल्प पाणीसाठा शिल्लक असल्याने पालखेड डाव्या कालव्यावरील शासनमान्य पाणीपुरवठा योजना व प्रासंगिक आरक्षणातील गावांनाच 25 मार्च ते 9 एप्रिल, 2024 दरम्यान पालखेड डाव्या कालव्याद्वारे/नदीद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती, पालखेड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता वैभव भागवत यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

या प्रासंगिक आरक्षणामध्ये येवला नगरपरिषद येवला, मनमाड नगरपरिषद मनमाड, येवला तालुक्यातील 38 गांवे पाणीपुरवठा योजना, येवला तालुक्यातील आंबेगाव ग्रामपंचायत, मध्य रेल्वे मनमाड, काकासाहेब वाघ साखर कारखाना, रानवड, ता. निफाड या शासनमान्य पाणी पुरवठा योजनांना व कादवा नदीवरील दिंडोरी तसेच निफाड व येवला तालुक्यातील प्रासंगिक आरक्षणातील गावांचा समावेश आहे.

पालखेड डावा कालव्याचे माहे मार्च/एप्रिल २०२४ च्या बिगर सिंचन आवर्तनाच्या पूर्व तयारीबाबत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. सदर आवर्तन हे बिगर सिंचनाचे असल्यामुळे लाभक्षेत्रातील नागरिक/शेतकरी यांनी पाण्याचा अनधिकृत उपसा करु नये. अनधिकृत उपसा करणाऱ्यांवर प्रचलित शासकीय नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असेही पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin


Sahebrao Thakare

वेगवान ऑनलाईनमध्ये मुख्यसंपादक म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, पुण्यनगरी, पुढारी,अॅग्रोवन, टीव्ही ९ मराठी, पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान नाशिक, इंडिया हिंदी न्यूज, बीजनेस बातम्यांचे संपादकीय म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम,शेती, उद्योग, खेळ,बीजनेस विषयातील बातम्यांमध्ये हातखंडा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!