नाशिक ग्रामीण

९९ हजार १५० मे. टन कांदा निर्यातीची आकडेवारी जुनीच


 

वेगवान नाशिक/समीर पठाण 

लासलगाव/ २७ एप्रिल २०२४

नाशिक व्हॅाटसअप ग्रुपJoin
whatsapp channelJoin

 

केंद्र सरकारने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कांदा निर्यातीला परवानगी दिली असल्याच्या बातम्या आज काही माध्यमांत प्रसिद्ध झाल्या.मात्र प्रत्यक्षात ही कांदा निर्यातीची ही आकडेवारी मार्च व एप्रिल महिन्यातील

एकत्र करून दिलेली असून संबंधित निर्यातीला आधीच परवानगी दिली आहे.त्यामुळे केंद्राने आकड्यांच्या खेळात शेतकऱ्यांना गुंतवू नये अशी प्रतिक्रिया कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भरत दिघोळे यांनी दिली आहे.

 

बांगलादेश,यूएई,भूतान,बहरीन,मॉरिशस आणि श्रीलंका या सहा देशांमध्ये 99,150 मेट्रिक टन कांदा निर्यात करण्याची परवानगी नॅशनल कोऑपरेटिव्ह एक्सपोर्ट्स लिमिटेड (NCEL) ला दिली आहे मात्र ही परवानगी मार्च आणि एप्रिल महिन्यात देण्यात आली आहे ही परवानगी जुनी असून याबाबत कुठले नव्याने अध्यादेश काढण्यात आले नाही.प्रत्यक्षात ही परवानगी यापूर्वीच टप्प्या टप्प्याने देण्यात आली असून आज देण्यात आलेले वृत्त म्हणजे त्याची केवळ एकत्रित आकडेवारी असल्याचे शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींचे म्हणणे आहे.

 

या आगोदर दिलेल्या परवानगीत 99 हजार 150 मेट्रिक टन पैकी साडेपाच ते सहा हजार मेट्रिक टन कांदा फक्त दीड महिन्यात निर्यात झाला ह्या निर्यातीपासून शेतकऱ्यांना कुठलाही फायदा होत नाही सरकार ने चुकीच्या बातम्या देऊ नये.संपूर्ण कांद्याची निर्यातबंदी हटवावी अशी मागणी लासलगाव बाजार समितीचे व्यापारी संचालक व कांदा निर्यातदार व्यापारी प्रवीण कदम यांनी केली आहे


अरुण थोरे

अरुण थोरे  गेल्या 3 वर्षापासून वेगवान मिडीया मध्ये काम करत असुन,पत्रकारितेची सुरुवात वेगवान सहमुहातुन झाली. सध्या वेगवान नाशिक मध्ये प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. निफाड तालुक्यातून  शेती, राजकारण, क्राईम, विषयामध्ये चांगले ज्ञान असून शेतक-यांसाठी लेखन करण्याची आवड.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!