नाशिक ग्रामीण

ब्रेकींगः नाशिकः बोलेरोचा मोठा अपघात पाच जण ठार Nashik News

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी -ढाकंबे रस्त्यावर बोलेरे व दुचाकी यांच्या भीषण अपघात होऊन पाच जण ठार झाल्याची दुर्देवी घटना झाली आहे.


वेगवान नाशिक / Wegwan Nashik News

नाशिक, ता. 5 एप्रिल 2024-  Nashik News देशभरात आणि राज्यात महामार्ग आणि रस्ते बांधणीचे काम जोरात सुरू आहे. मात्र, अतिवेग आणि बेफाम वाहन चालवणे ही देखील अपघातांची प्रमुख कारणे आहेत. त्यामुळे अलीकडच्या काळात रस्ते अपघातांचे प्रमाण वाढले आहे.Nashik News Nashik: Major accident in Bolero, five killed

नुकतीच नाशिक-दिंडोरी मार्गावर ढाकंबे गावाजवळ बोलेरो कार आणि दुचाकी यांच्यात भीषण धडक झाली. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

चारचाकी गाडीचा टायर फुटताच चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि विरुद्ध दिशेने येणाऱ्या बोलेरो कार जोरदार धडकली. अपघातानंतर स्थानिक लोकांनी तत्काळ घटनास्थळ गाठून पोलिसांना बोलावले. त्यानंतर दिंडोरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. दरम्यान, अपघातातील मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

या अपघातात बोलेरो कारचे मोठे नुकसान झाल्याचे या घटनेत दिसून आले. स्थानिक लोकांनीही तातडीने मदतीसाठी घटनास्थळी पोहोचण्याचा प्रयत्न केला.

या अपघातामध्ये सदर व्यक्ती कोणत्या ठिकाणचे राहणारे होते याची माहिती आमचे प्रतिनिधी घेत आहे. लवकरचं याचे अपडेट याच ठिकाणी काही वेळात केले जाईल.


Sahebrao Thakare

वेगवान ऑनलाईनमध्ये मुख्यसंपादक म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, पुण्यनगरी, पुढारी,अॅग्रोवन, टीव्ही ९ मराठी, पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान नाशिक, इंडिया हिंदी न्यूज, बीजनेस बातम्यांचे संपादकीय म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम,शेती, उद्योग, खेळ,बीजनेस विषयातील बातम्यांमध्ये हातखंडा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!