कुंभमेळा दृष्टीने नाशिकला ट्रक टर्मिनल उभारा … ! खासदार राजाभाऊ वाजे
नाशिक लॉजिस्टीक हब होण्यासाठी लोकसभेत मुद्दा केला उपस्थित,,,

वेगवान नाशिक / भाऊसाहेब हांडोरे
ट्रक टर्मिनल उभारा, खासदार राजाभाऊ वाजे यांची संसदेत मागणी ,,,,
नाशिक लॉजीस्टिक हब होण्यासाठी ट्रक टर्मिनल होणे गरजेचे असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले .
” कुंभमेळा दृष्टीक्षेपात ठेऊन या संदर्भात गांभीर्याने पाहिले पाहिजे असे मत श्री, वाजे यांनी व्यक्त केले आहे. “
सिन्नर , दि : 17 मार्च — नाशिक हे भौगोलिक दृष्ट्या अत्यंत मोक्याच्या ठिकाणी आहे. यासह वाढत असलेल्या पायाभूत सुविधा आणि विविध रस्ते निर्मिती आदींमुळे नाशिक अधिक महत्वाचं केंद्र बनत चालले आहे. नाशिक हे लॉजीस्टिकच्या अनुषंगाने विकसित होऊन लॉजीस्टिक हब व्हावे यासाठी ट्रक टर्मिनल उभारणे गरजेचे आहे. याबाबत संसदेच्या उन्हाळी अधिवेशनात खासदार राजाभाऊ वाजे यांनी शहराच्या बाह्य भागात ट्रक टर्मिनल उभारण्याची मागणी केली आहे.
नाशिक शहरात आगामी काळात वाहतूक कोंडी ही भीषण समस्या निर्माण होणार आहे. त्याच्या झळा आत्तापासूनच बसायला सुरवात झाली आहे. ही समस्या आटोक्यात आणण्यासाठी ट्रक टर्मिनल हे मोठं साधन ठरणार आहे. तसेच या माध्यमातून शहरातील व्यवसाय, उद्योग वाढीसाठी देखील चालना मिळणार आहे.
” कृषी क्षेत्राला चालना. —– ट्क टर्मिनल झाल्यास त्यामाध्यमातून नाशिक मधील कांदा, द्राक्ष, डाळिंब आदींसह इतर कृषी उत्पादनांच्या बाबतीत अधिक फायदेशीर ठरेल असे मत त्यांनी व्यक्त केली आहे.
