पार गोदावरी एकात्मिक नदी जोड प्रकल्प एक उमेद,,,मकरंद सोनवणे
पार गोदावरी एकात्मिक नदी जोड प्रकल्प एक उमेद,,,मकरंद सोनवणे

वेगवान नाशिक/ एकनाथ भालेराव
नाशिक /दिनांक :28 मार्च/ पार-तापी-नर्मदा हा आंतरराज्य प्रकल्प रद्द करून घेतल्यामुळे नार-पार खोऱ्यातील शिल्लक 9.76 टीएमसी आणि उपसा सिंचन योजना क्रमांक 3 आणि 4 चे 3 टीएमसी हे सर्व पाणी एकत्रित करून पार-गोदावरी हा एकात्मिक नदीजोड प्रकल्प राबवण्याची जोरदार मागणी आ .छगन भुजबळ यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत केली आहे.
हे पाणी नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी, चांदवड, येवला आणि संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर, गंगापूर या दुष्काळी भागात नेण्यासाठी पायाभूत सुविधा माजी उप मुख्यमंत्री भुजबळ यांनी मांजरपाडा योजनेच्या माध्यमातून आधीच करून ठेवल्या आहेत.
मांजरपाडा प्रकल्पमार्गे पार गोदावरीचे पाणी पुणेगाव धरणातून पुणेगाव-दरसवाडी-डोंगरगाव कालव्याद्वारे दिंडोरी, चांदवड, येवला आणि संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर, गंगापूर या दुष्काळी भागात नेले जाणार आहे
दमणगंगा एकदरे गोदावरी नदीजोड प्रकल्पाच्या प्रशासकीय मान्यतेमध्ये तांत्रिक सुधारणा करून एकदरे धरणाचे पाणी वाघाड, करंजवण, ओझरखेड व तिसगाव धरणात वळविण्याची मागणी केली आहे
एकदरे धरणाचे पाणी वाघाड धरणातून मराठवाड्याला जाणार आहे. त्या पाण्यातील काही पाणी नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी, चांदवड, येवला, नांदगाव व निफाड तालुक्यांतील अतिदुष्काळी भागातील गावांना दिल्यास या भागातील पिण्याच्या, शेतीच्या व औद्योगिकीकरणाच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविणे शक्य आहे.
त्याकरिता वाघाड धरणात येणाऱ्या पाण्यामधून काही पाणी कॅनॉलद्वारे करंजवण धरणात आणल्यास आणि करंजवण, ओझरखेड, तिसगाव ही धरणे एकमेकांना जोडल्यास ही तिन्ही धरणे एकदरे धरणातील अतिरिक्त पाण्याने भरली जातील. अशा प्रकारे करंजवण, ओझरखेड, तिसगाव धरणाची पाण्याची तूट कायमस्वरूपी भरून निघेल
मांजरपाडा प्रकल्पमार्गे पार गोदावरीचे पाणी पुणेगाव धरणातून पुणेगाव-दरसवाडी-डोंगरगाव कालव्याद्वारे दिंडोरी, चांदवड, येवला आणि संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर, गंगापूर या दुष्काळी भागात नेले जाणार आहे. त्यामुळे त्या भागातील दुष्काळ कायमस्वरूपी हटणार आहे
……………………………………….
प्रतिक्रिया….
नाशिक, संभाजीनगर दुष्काळी परिसर सुजलाम सुफलाम होणार
नाशिक, संभाजीनगर जिल्ह्यातील काही परिसर हा कायमस्वरूपी दुष्काळी आणि केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून होता. बागायती शेती दूरदूरपर्यंत इथे नजरेस पडत नव्हती. या प्रकल्पामुळे दुष्काळी परिसर सुजलाम सुफलाम होणार आहे. पुढच्या कित्येक पिढ्यांना या प्रकल्पामुळे समृद्धीची फळं चाखायला मिळणार आहेत. भुजबळांनी सगळ्या क्षमता या प्रकल्पासाठी वापरल्या. हल्ली एवढा पाठपुरावा करणाऱ्या नेत्यांची संख्या दुर्मिळ आहे. अशा लोकनेत्यांची समाजाला मोठी गरज आहे. नव्या पिढीतील नेत्यांनी हे नेतृत्व गुण जरूर आत्मसात करायला हवेत…
मकरंद सुधाकर सोनवणे
माजी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती येवला
प्रगतिशील युवा शेतकरी

वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी,लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान न्यूज येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम,शेती, उद्योग, खेळ,बीजनेस विषयातील बातम्यांमध्ये