वेगवान नाशिक/ Nashik/अविनाश पारखे
मनमाड,नांदगाव, दि.25 जून 24 – आज राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. ‘सिबील स्कोअर’ची सक्ती न करता पीक कर्ज देण्याचे आणि सहकारी बँकांचे बळकटीकरण करण्याचा यात समावेश आहे.बैठकीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.
बँकर्स समितीने 2024-25 साठी 41286 कोटी रुपयांचा नवीन वार्षिक पत आराखडा मंजूर केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अल्प, अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना बँकानी हात आखडता घेऊ नये असे आवाहन केले.
बैठकीस महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, कृषी मंत्री धनंजय मुंडे,सहकार मंत्री दिलीप वळसे –पाटील,मुख्य सचिव डॉ.नितीन करीर, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ.आय.एस.चहल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेशकुमार, सहकार व पणन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अनुपकुमार,वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता,नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांच्यासह विविध विभागांचे सचिव तसेच राज्यस्तरीय बँकर्स समितीचे अध्यक्ष तथा बँक ऑफ महाराष्ट्राचे कार्यकारी संचालक आशिष पांडे,रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे प्रादेशिक संचालक अविरल जैन,सचिन शेंडे,‘नाबार्ड’च्या मुख्य व्यवस्थापक रश्मी दरड, विविध बँकाचे वरिष्ठ अधिकारी आदी उपस्थित होते.
Shri.Avinash Parkhe
Working with Wegwan Nashik since 2019..As a freelance reporter I always try to clear out the both sides. Always stand for what is right…what is truth…
One Comment