महाराष्ट्रात जोरदार गारपीठ, या जिल्ह्यात तांडव

वेगवान मराठी / धिरेंद्र कुलकर्णी
नागपूर, ता. 30 मार्च 2025 – वातावरणात प्रचंड प्रमाणात उष्णता असून अचानक गेल्या चार-पाच दिवसांमध्ये हवामान विभागाकडून मोठं अपडेट येत आहे.
यामध्ये आता महाराष्ट्रासाठी हवामान विभागाचे एक महत्त्वाचे अपडेट आलेले आहे. ते अपडेट म्हणजे महाराष्ट्रामध्ये जोरदार पद्धतीने गारपीट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
एवढंच नाही तर वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रात पुढील हवामान कसे राहील हे आपल्याला जाणून घेणे गरजेचे आहे. पंजाब डख यांनी सुद्धा महाराष्ट्रामध्ये पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज वर्तवलेला आहे.
पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खान्देश, मराठवाडा या सर्व भागामध्ये दररोज एक-एक, दोन-दोन दिवस मुक्काम करत पाऊस पडणार आहे. तसेच कोकणपट्टी मध्ये जास्त पाऊस पडणार आहे आणि गारपिटीची देखील शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रात देखील पाऊस आणि गारपिटीची शक्यता असल्याचे ही डख यांनी सांगितलंय.
सध्या खास करून पावसाचा फटका शेतकरी वर्गाला बसणार आहे, कारण सध्या शेतामध्ये कांदे काढण्याचे काम सुरू आहे. त्याचबरोबर गहू, हरभरा काढणीसाठी आलेले आहेत. अनेक ठिकाणी मका पीक काढणीसाठी आल्यामुळे त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. द्राक्ष पिकालाही या गारपिट आणि वादळ वाऱ्याचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे येणाऱ्या आगामी अवकाळी पावसाच संकट शेतकऱ्यांवर घोंगवत आहे.
