शेतकरी कर्जमाफीचंं काय झालं … ? ” मनसे “ने धरलं सरकारला धारेवर
सरपंच संतोष देशमुख व आंदोलक सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी मनसेने...

वेगवान नाशिक / भाऊसाहेब हांडोरे
सिन्नर : दि , 4 एप्रिल — शेतकऱ्यांना कर्ज माफिचे काय झालं या सह महाराष्ट्रात अतिशय महत्त्वाचा मुद्दा सरपंच संतोष देशमुख व आंदोलक सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे,या संदर्भात सिन्नर तालुका मनसे अध्यक्ष राम तात्या खरणार व जिल्हा उपाध्यक्ष अमोल जाधव यांच्या नेतृत्वाखाली लाक्षणिक आंदोलन करून सिन्नर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. तसेच शेतकरी पिक विमा एक रूपयात पुन्हा त्वरित सुरू करावा ह्या प्रमुख मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारला धारेवर धरले होते.
शेतकरी कर्जमाफीचंं काय झालं मनसे ने धरलं सरकारला धारेवर…
लाक्षणिक आंदोलन करून सिन्नर तहसीलदारांना निवेदन सादर ….
महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष सन्मा राजसाहेब ठाकरे, सन्मा मनविसे अध्यक्ष अमितसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने प्रदेश सरचिटणीस दिनकर आण्णा पाटील व जिल्हा पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिन्नर तालुक्याच्या वतीने शेतकरी बांधवांना कर्ज माफी करुन सातबारा कोरा करुन द्यावा व १ रुपयात पिक विमा योजना पुन्हा सुरू करावी व मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख व आंदोलक सोमनाथ सुर्यवंशी यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करावी यासाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिन्नर वतीने धरणे आंदोलन करुन तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
*यावेळी उपजिल्हाध्यक्ष अमोल भाऊ जाधव, जिल्हा संघटक बाळासाहेब गोळेसर तालुकाध्यक्ष रामदास खैरनार, शहराध्यक्ष गणेश मुत्रक, मा तालुका अध्यक्ष विलसभाऊ सांगळे, तालुका सचिव शरद घुगे, शहर संघटक एकनाथ दिघे, शहर उपाध्यक्ष भिवाजी शिंदे, शहर सरचिटणीस लखन खर्डे, चेतन दराडे, कृष्णा पालवे, सागर वाघचौरे, आदीसह शेतकरी बांधव व महाराष्ट्र सैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.
