आर्थिक

बॅंकेतील एफड्या खोट्या! लोकांच्या खात्यावरील एफड्या झाल्या रिकाम्या ?

पोलिसांकडून अधिक तपास सुरू


वेगवान नाशिक/अविनाश पारखे,

मनमाड,नांदगाव- ता. 22 नाशिकमध्ये एका राष्ट्रीयीकृत बँकेमध्ये शेतक-यांचा गोंधळ पहायला मिळाला. एफडी बोगस निघाल्याचा आरोप करत शेतक-यांना गोंधळ घातला. बँकेतील कर्मचारी आणि एजंट यांनी संगनमताने शेतक-यांना लाखोंचा गंडा घातल्याचा आरोप करण्यात येत आहे. बँकेच्या प्रशासनाने मात्र याबाबत बोलण्यास नकार दिला आहे.

नेमका काय आहे प्रकार?

नाशिक व्हॅाटसअप ग्रुपJoin
नाशिक व्हॅाटस्अप चॅनलJoin

नाशिक जिल्ह्यातील एका राष्ट्रीयकृत बँकेतून अनेक जणांच्या एफडी बोगस निघाल्यास समोर आले आहे. या बँकेतील कर्मचारी आणि एजंट मिळून अनेक शेतकऱ्यांना लाखोंचा गंडा घातल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबाबत काही तक्रारी समोर आल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी या बँकेमध्ये गोंधळ घातला.

प्रत्येक जण आपल्या एफडी खऱ्या आहे की नाही याचा तपास करत आहे. बँक प्रशासनाला याबाबत विचारले असता प्रशासनाने पोलिसांमध्ये तक्रार केल्याचं स्पष्ट केलं आहे. पोलीस लवकरच याबाबतीत तपास करून एफ आय आर नोंदवतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. मात्र, कॅमेरासमोर अधिकृतपणे काहीही बोलण्यास त्यांनी नकार दिला.

मे युनियन बँक ऑफ इंडिया,मनमाड शाखेत मुदत ठेव ठेवलेल्या ग्राहकांची आर्थिक फसवणूक झाल्याची घटना समोर येत आहे. शहरातील युनियन बँक शाखेमध्ये ग्राहकांनी विमा योजनांच्या माध्यमातून मुदत ठेव ठेवली होती. ही मुदत ठेव परस्पर काढून घेतल्याने युनियन बँकेचे शाखेमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

यासंदर्भात बँक मॅनेजर अशोक सरोज यांनी मनमाड पोलीस स्थानकात संदीप देशमुख,राहणार चाळीसगाव या एजंट विरोधात भादंवि कलम 420,406,465,471 अन्वये अपहार प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून अंदाजे एक कोटी 39 लाखाची फसवणूक केल्याचे तक्रारीमध्ये म्हटले आहे. अधिक तपास मनमाड शहर पोलीस यांनी सुरू केला आहे.


अविनाश पारखे

Shri.Avinash ParkheWorking with Wegwan Nashik since 2019..As a freelance reporter I always try to clear out the both sides. Always stand for what is right...what is truth...
Back to top button
error: Content is protected !!