नाफेड व एनसीसीएफ करणार एवढा लाख मे. टन कांदा खरेदी
वेगवान नाशिक/ अरूण थोरे
मरळगोई, ता.२७ मार्च २०२४ केंद्राने कांद्यावरील निर्यात बंदीला पुढील आदेश येईपर्यंत मुदत वाढ दिलेली असतानाच, पुढील वर्षीच्या नियोजनासाठी केंद्र सरकारने नाफेड व एनसीसीएफ या संस्थांना ५ लाख टन कांदा खरेदीचे निर्देश दिल्याची माहिती समोर येत आहे.
बाजार भाव स्थिर करण्यासाठी दरवर्षी केंद्र सरकार नाफेडच्या माध्यमातून कांद्याचा बफर स्टॉक करत असते. त्याच अनुषंगाने याही वर्षी केंद्र सरकार शेतकऱ्यांकडून नाफेड व एनसीसीएफ च्या माध्यमातून ५ लाख टन कांदा खरेदी करनार असुन ही खरेदी थेट शेतकऱ्यांकडून करावी अशा सूचना केंद्रीय ग्राहक व्यवहार सचिव रोहीत कुमार सिंह यांनी दिल्या आहेत.
एकीकडे निर्यात बंदीला मुदत वाढ देऊन, केंद्राने शेतकर्यांचे कंबरडं मोडले असुन, दुसरीकडे भाव वाढ रोखण्यासाठी आधीच कंबर कसल्याचे चित्र दिसत आहे.नाफेड ची खरेदी नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेली असते, या वेळच्या खरेदीत वेगळं काही नसणारं ह्याच दृष्टीने कांदा उत्पादक शेतकरी पाहत आहे.
अरुण थोरे गेल्या 3 वर्षापासून वेगवान मिडीया मध्ये काम करत असुन,पत्रकारितेची सुरुवात वेगवान सहमुहातुन झाली. सध्या वेगवान नाशिक मध्ये प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. निफाड तालुक्यातून शेती, राजकारण, क्राईम, विषयामध्ये चांगले ज्ञान असून शेतक-यांसाठी लेखन करण्याची आवड.