लासलगाव बाजार समिती राहणार इतक्या दिवस बंद
वेगवान नाशिक/अरुण थोरे
लासलगाव, ता. २७ मार्च २०२४
लासलगाव बाजार समिती मार्च वर्षअखेर (मार्च एन्ड) असल्याने, दिनांक २९ मार्च ते २ एप्रिल २०२४ या पाच दिवसांसाठी कांदा लिलाव बंद असनार असल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाने दिली आहे.
दिनांक २२ मार्च २०२४ रोजीच्या लासलगाव व्यापारी असोसिएशनने बाजार समिती प्रशासनास दिलेल्या पत्राच्या अनुषंगाने दिनांक २९ मार्च ते २ एप्रिल २०२४ पर्यंत मार्च वर्षाअखेर असल्याने, लासलगाव बाजार समितीत कांद्याचे लिलाव बंद असुन,
यादरम्यान कांदा बाजार समितीत आणु नये असे आव्हान बाजार समिती कडुन करण्यात आले आहे. दिनांक ३ एप्रिल २०२४ पासुन बाजार समितीतील कांदा लिलाव पुर्ववत होतील.
अरुण थोरे गेल्या 3 वर्षापासून वेगवान मिडीया मध्ये काम करत असुन,पत्रकारितेची सुरुवात वेगवान सहमुहातुन झाली. सध्या वेगवान नाशिक मध्ये प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. निफाड तालुक्यातून शेती, राजकारण, क्राईम, विषयामध्ये चांगले ज्ञान असून शेतक-यांसाठी लेखन करण्याची आवड.