महाराष्ट्रात गारपीटीचा कहर,नाशिक मध्ये नदीला पुर

वेगवान नेटवर्क / मारुती जगधने
नाशिक, ता. 3 एप्रिल 2025- जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील कोडवेल परिसरामध्ये बेमोसमी पावसाने चांगलेच थैमान घातले असून संबंधित नाल्यांना चांगला पूर पाणी आले.
दक्षिण छत्तीसगड आणि लगतच्या भागात चक्राकार वाऱ्याचा एक पट्टा आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, मध्य महाराष्ट्रापासून कोमोरिन क्षेत्रातून कमी पातळीपर्यंत चक्राकार अभिसरणाच्या स्वरूपात वाऱ्यांचा उत्तर-दक्षिण प्रवाह सुरू आहे. यामुळे, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून येणारे दमट वारे खालच्या पातळीवर एकमेकांवर आदळत आहेत.
या बेमोसमी पावसामुळे कांदे टमाटे भाजीपाला गहू हरभरे या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतात उभी असलेली पिके काढणीस आलेली आहे या पिकांची मोठी हानी झाली अचानक आलेल्या बे मोसमी पावसाने कोटबेल सटाणा नामपुर आखतवाडे आनंदपुर जायखेडा आखतवडा या परिसरामध्ये देखील पावसाने हजेरी लावली आहे.
यासह नाशिक जिल्ह्यात देखील पावसाने नांदगाव मनमाड मध्ये पावसाचे आगमन झाले बे मोसमी पावसाचे सुमारे अर्धा तासात परिसरह झोडपून काढला .
मागील वर्षी देखील याच कालावधीमध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये गारपिटीने मोठे नुकसान झाले होते आज देखील गारांचा पाऊस मोठ्या प्रमाणात आला ठीक ठिकाणी दरम्यान झालेल्या पावसाने शेतकरी मात्र चिंता तुर झाला आहे.
शेतकरी शासन कर्जमुक्ती करेल या प्रतीक्षेत आहे अशाच परिस्थितीमध्ये बे मोसमी पाऊस आल्याने पिकांची मोठी नुकसान झाले आहेत आता शासन शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देता की काय या संदर्भात ठिकठिकाणी लोक आता आंदोलन करू लागले आहे.
विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात ५० ते ६० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्यासह विजांच्या कडकडाट आणि गारपीट होण्याची शक्यता आहे.
विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूक काळामध्ये जाहीरपणे कर्जमुक्तीची घोषणा केली मात्र आता धूमजाव करू लागल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सुर उंमटत आहे. प्रशासनाने दिलेले शब्द पाळावा आणि शेतकऱ्यांना कर्जमुक्ती पासून मुक्ती द्यावी अशी अपेक्षा सर्व थरातून येत आहे.
