आरोग्यआर्थिकखेळनाशिक ग्रामीणनाशिक जिल्हा पशु-पक्षी खरेदी विक्रीनाशिकचे राजकारणमोठ्या बातम्याशेतीशेती बाजारभाव

लोकशाही शिल्लक राहणार नाही.हे संकट देशासमोर आहे

भास्कर भगरे यांच्या प्रचारादरम्यान शरद पवार यांनी केली भीती व्यक्त


वेगवान नाशिक/नाशिक,अविनाश पारखे,मनमाड नांदगाव-

लोकसभा 2024 च्या दिंडोरी मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार,महाविकास आघाडीच्या वतीने श्री भास्कर भगरे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने शरद पवार मनमाड येथे आले होते. मनमाड येथे झालेल्या जाहीर सभेत त्यांनी मोदी सरकार जनतेची कशी फसवणूक करते,कशी भीती पसरवते यावर भाष्य केले आणि वनवासी नव्हे तर आदिवासी सर्वसामान्य मनुष्याला उमेदवारी दिली आहे.त्यांना भरघोस मतांनी विजयी करून 1980 ची पुनरावृत्ती करून नाशिक मधील तीनही जागा मताधिक्याने जिंकून द्याल असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी जयंत पाटिल,राजेश टोपे,अनिल देशमुख रक्षा खडसे,अनिल आहेर,श्रीराम शेटे यांच्यासह स्थानिक नेत्यांची भाषणे झाली.त्यांनी लोकसभा उमेदवार भास्कर भगरे यांना मतदान करावे असे आवाहन केले.

नाशिक व्हॅाटसअप ग्रुपJoin
नाशिक व्हॅाटस्अप चॅनलJoin

आजपर्यंत महात्मा गांधी ते मनमोहन सिंग अनेकांनी या देशाची संसदीय लोकशाही पद्धती जतन केली.आज चित्र वेगळे दिसते.देशाची सत्ता मोदींच्या हातात आहे मात्र मोदींची भुमिका बोलायचे एक,करायचे दुसरे अशी आहे.

देशाची सत्ता आपल्या मुट्ठीत ठेवली.कोणत्याच पंचायत समिती, ग्रामपंचायत,जिल्हा परिषद निवडणुका झाल्या नाहीत.सर्व थांबल्या.उद्या देशाची निवडणूक थांबवतील नि देशाची सत्ता आपल्या मुट्ठीत घेतील.त्याने लोकशाही शिल्लक राहणार नाही.हे संकट देशासमोर आहे.कुणी तुमच सोन चोरणार नाही.ही शुद्ध फसवणूक आहे. लोकांच्या मनात संभ्रम,भीती तयार करण्याच काम आहे.आपल्याला आलेल अपयश लपवायच म्हणून लोकांचा विचार भलतीकडे वळवायचा,त्यांच्या मनात शंका निर्माण करायची अशा प्रकारची भाषण केली जात आहे.

हे सरकार फसवे सरकार आहे.जल,जमीन,जंगल वाचवणारे आदिवासी आहेत,वनवासी नाहीत.मात्र हे सरकार चुकीची माहिती पसरवत आहेत.

कांद्यावर बंदी,साखरेवर बंदी,कांद्यावर बंदी, कापसावर बंदी.मला काही समजत नाही, कष्टाने शेतकऱ्याने शेती पिकवायची आणि ते दुनियाच्या बाजारात पाठवून दोन पैसे त्याच्या पदरामध्ये पडायचे,त्यांचा संसार फुलला तर त्याला मदत करण्याची सोडून बंदी घालायची आणि या जिल्ह्यात येऊन आमच्यावर टीका करायची.माझं मोदी साहेबांना स्पष्ट सांगणे आहे की,ते अभिमानाने सांगतात आम्ही गरीब लोकांना फुकट धान्य दिलं. तुमच्या वाडवडिलांच्या खिशातून नाही धान्य दिलं,  ते पिकवलं शेतकऱ्यांनी,काळ्या आईशी इमान राखून त्यांनी मेहनत केली,त्यांनी धान्य पिकवलं. देशाची गरज भागवून अधिक धान्य कसं राहील याची खबरदारी घेतली. अख्ख्या देशाला धान्य पुरवण्याकरता हे आमच्या शेतकऱ्यांनी केल.आज मोदी साहेब सांगतात,आम्ही सगळ्यांना फुकट धान्य देतो. मेहनत शेतकऱ्यांची आहे,मेहनत पूर्वीच्या सरकारची आहे.हे सगळ्यांनी तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. हे सरकार फसवेगिरीच सरकार आहे. याच्यावर विश्वास धरता कामा नये.

शेतकरी आत्महत्या करतात ही गोष्ट चांगली नाही.2 महिन्यात 700 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या.याचा अर्थ असा आहे,त्यांच्या महत्वाच्या प्रश्नांची सोडवणूक केली जात नाही.

म्हणुन शेतकर्‍यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी भास्कर भगरे यांना यावेळी खासदार करा असे आवाहन शरद पवार यांनी केले.


अविनाश पारखे

Shri.Avinash ParkheWorking with Wegwan Nashik since 2019..As a freelance reporter I always try to clear out the both sides. Always stand for what is right...what is truth...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!