संशयित आरोपी संदीप देशमुखच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
पोलीस कोठडीत रवानगी
वेगवान नाशिक/नाशिक/अविनाश पारखे,मनमाड, नांदगाव,दिनांक 24 मे 2024-
युनियन बँक ऑफ इंडिया मनमाड शाखेत एफडी मध्ये झालेल्या फसवणूक घोटाळा प्रकरणी संबंधित फसवणूक झालेल्या नागरिकांनी तालुक्याचे आमदार सुहास अण्णा कांदे यांच्याकडे मदतीची याचना केली आहे.
मनमाड शहरातील व ग्रामीण भागातील कित्येक सेवानिवृत्त कर्मचारी,सरकारी कर्मचारी,व्यापारी, शेतकरी आणि अनेक गोरगरीब ग्राहकांनी बँकेच्या विमा प्रतिनिधी संदीप देशमुख यांच्या माध्यमातून बँकेमध्ये गुंतवणूक केली होती.
मात्र सदर गुंतवणूक ही फसवणुकीची झाली असल्याचे लक्षात आले आमदार कांदे यांनी या विषयात लक्ष घालून आम्हा ठेवीदार नागरिकांना न्याय मिळवून द्यावा अशी विनंती सुहास अण्णा कांदे यांच्याकडे केली आहे.
दरम्यान अपहार केलेले बँकेचे विमा प्रतिनिधी संदीप देशमुख याला चाळीसगाव येथून मनमाड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
दुपारी कोर्टात हजर केल्यानंतर मा.कोर्टाने देशमुख यास पोलीस कोठडी सुनावली आहे अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव देशमुख यांनी दिली.या घोटाळ्याची व्याप्ती किती कोटी रुपयांमध्ये आहे?हे उघडकीस येऊ शकते.तोपर्यंत मात्र ठेवीदारांच्या मनात आपल्या रकमा मिळतील की नाही? याबाबत धाकधूक वाढली आहे.
दरम्यान बँक प्रशासनाने फसवणूक झालेल्या नागरिक खातेदारांची माहिती घेण्यासाठी स्वतंत्र टेबल केला असल्याचे समजते.संबंधित नागरिकांनी तेथे संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.
Shri.Avinash Parkhe
Working with Wegwan Nashik since 2019..As a freelance reporter I always try to clear out the both sides. Always stand for what is right…what is truth…