भारती पवार यांना मत म्हणजे मोदींना आशीर्वाद
फडणवीस यांचे मनमाडमध्ये आवाहन
वेगवान नाशिक/Nashik/अविनाश पारखे, मनमाड,नांदगाव-
भारती पवार यांना मत म्हणजे मोदींना आशीर्वाद असे म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मनमाड मधील जनतेला 20 मे 2024 रोजी होत असलेल्या लोकसभा मतदानासाठी आवाहन केले.
आपल्या सुमारे 22 मिनिटाच्या भाषणांमध्ये फडणवीस यांनी मोदी सरकारने केलेल्या विविध कामांचा उहापोह केला. त्यामध्ये विशेष करून रस्ते,रेल्वे,मोफत अन्नधान्य वाटप,शेतकरी सन्मान निधी वाटप, कोरोना लस,महिला बचत गट कर्ज, दहशतवादी, अतिरेकी हल्ले याबाबत आकडेवारी जाहीररित्या सांगितली.
कांद्याच्या प्रश्नाबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की,लवकरच कायमस्वरूपी तोडगा काढू.
आपल्या प्रास्ताविकात सुहास कांदे यांनी मनमाड शहरासाठी बायपासची आवश्यकता असल्याचा उल्लेख केला होता. त्याबाबत सांगताना आपण तसा प्रस्ताव केंद्रात सादर करावा,मोदी साहेब त्याला नक्कीच भरभरून निधी देतील असेही सांगितले.
मनमाड, नांदगाव तालुक्यातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी 21 तारखेला मीटिंग लावण्याचे फडणवीस यांनी आश्वासन दिले.
यावेळी पंकजा मुंडे ,सुहास कांदे ,भारती पवार यांची भाषणे झाली.
मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
Shri.Avinash Parkhe
Working with Wegwan Nashik since 2019..As a freelance reporter I always try to clear out the both sides. Always stand for what is right…what is truth…