आर्थिकनाशिक क्राईमनाशिक ग्रामीणमोठ्या बातम्या
वृद्धास दमदाटी करून 50 लाखाची मागणी
मुलगा आणि आणखी एक जणाविरुद्ध पोलिसात तक्रार

वेगवान नाशिक/Nashik/अविनाश पारखे, मनमाड,नांदगाव,दि.25 मे 2024 –
मनमाड शहरातील शांतीनगर भागात राहणारे तापीराम चोथमल यांच्याकडे त्यांचा मुलगा हरीश चोथमल आणि इतर एक जण अशा दोन लोकांनी 50 लाख रुपयांची मागणी केली.50 लाख रुपये द्या म्हणून दमबाजी करत,शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली.
या संदर्भात तापीराम चोथमल यांनी मनमाड शहर पोलीस स्टेशनमध्ये हरिश चोथमल व इतर एक अशा एकूण दोन व्यक्तिविरुद्ध तक्रार नोंदवली आहे.
पोलीसांनी हरिश चोथमल व इतर एक यांच्याविरुद्ध भादंविक 452,323,504,506 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक बागल करत आहेत.

Shri.Avinash Parkhe
Working with Wegwan Nashik since 2019..As a freelance reporter I always try to clear out the both sides. Always stand for what is right…what is truth…