Nashik Businessआर्थिकनाशिक क्राईमनाशिक ग्रामीणनाशिकचे राजकारणमोठ्या बातम्याशेती

तुमच्या कष्टाचा एक रुपयाही बुडू देणार नाही,आमदार कांदे यांनी दिला शब्द

युनियन बँक एफडी घोटाळा प्रकरणी आमदार कांदे ॲक्शन मोडवर


वेगवान नाशिक/Nashik/अविनाश पारखे, मनमाड,नांदगाव,दि.24 मे.24-

युनियन बँक ऑफ इंडियाच्या मनमाड शाखेत शेकडो ग्राहकांच्या फिक्स डिपॉझिटच्या करोडो रुपयांना हडप करून चुना लावण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.

संतप्त झालेल्या नागरिकांनी आज आमदार सुहास कांदे यांची भेट घेत कैफियत मांडली असता, आमदारांनी तुमच्या कष्टाच्या पैशाची अशी उधळण होऊ देणार नाही. तुमच्या पै न पै चा परतावा त्यांना द्यावा लागेल असा दिलासा दिला.

नाशिक व्हॅाटसअप ग्रुपJoin
नाशिक व्हॅाटस्अप चॅनलJoin

मनमाडच्या आमदार संपर्क कार्यालयात फसवणूक झालेल्या ठेवीदारांची बैठक बोलावण्यात आली होती.यावेळी पोलीस उपधीक्षक महाजन, पोलीस निरीक्षक अशोक घुगे यांच्यासह माजी आमदार संजय पवार, फरहान खान,मयूर बोरसे,बबलू पाटील आदी नेते उपस्थित होते.

यावेळी आमदार कांदे यांनी संशयित कर्मचारी संदीप देशमुख ऐवजी संपूर्ण बँकेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. मात्र बँकेचे प्रबंधक यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधत या रकमेची हमी घेत असल्याचा दावा आमदार सुहास कांदे यांच्याशी बोलताना केला आहे.

दरम्यान आमदार कांदे यांनी फसवणूक झालेल्या सर्व ग्राहकांना तुमच्या जवळ जी काही कागदपत्रे असतील ती संपर्क कार्यालयात जमा करण्याचे आवाहन यावेळी केले व तुमच्या कष्टाचा एक रुपया ही बुडू देणार नसल्याची हमी दिली.

सोबत video…


अविनाश पारखे

Shri.Avinash ParkheWorking with Wegwan Nashik since 2019..As a freelance reporter I always try to clear out the both sides. Always stand for what is right...what is truth...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!