असा असेल विश्वगुरू संत निवृत्तीनाथ महाराज पंढरपुर आषाढी पालखी सोहळा
२० जूनला श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून प्रस्थान

Wegwan nashik/ वेगवान नाशिक
त्र्यंबकेश्वर येथून संत निवृत्तीनाथ महाराजांचा आषाढी वारी पालखी सोहळा महिन्याभराचा असेल. २० जूनला दुपारी दोनला संत निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिरातून प्रस्थान केलेला हा पालखी सोहळा २२ आणि २३ जूनला नाशिकमध्ये असेल.
२ जुलैला नगरमध्ये मुक्काम केल्यावर ३ जुलै रोजी सकाळी १० ते १२ वा. दरम्यान संत निवृत्तीनाथ महाराज समाधी सोहळा होईल. १६ जुलै रोजी वाखरी येथील सोहळा पार पाडल्यानंतर पंढरपूरमध्ये प्रदक्षिणा मार्गावरील श्री निवृत्तीनाथ महाराज मठात पालखी मुक्कामी पोचेल.
पंढरपूरमध्ये विठूरायाची आषाढी एकादशी १७ जुलैला असून २० जुलैपर्यंत पालखीचा मुक्काम पंढरपूरमध्ये असेल. त्यानंतर पालखी सोहळा त्र्यंबकेश्वरकडे प्रस्थान करेल.
पालखीचे प्रस्थान झाल्यावर पहिल्या दिवशी सायंकाळी पाचला पालखी त्र्यंबकेश्वरमधील गुरूंच्या घरी महानिर्वाणी आखाडामधील गहिनीनाथ समाधी स्थानी मुक्कामी पोचणार आहे.
२१ जूनला सायंकाळी पाचला पालखी सातपूरमध्ये मुक्कामी येईल.२२ जूनला सकाळी नऊला नाशिक पंचायत समिती आवारात, दुपारी बाराला काझीपुरामधील श्री नामदेव विठ्ठल मंदिरात पोचेल आणि तीनला पंचवटीतील आयुर्वेद रुग्णालयासमोरील गणेशवाडीतील नवीन भाजी मार्केटमध्ये मुक्कामी पालखी दाखल होईल.
पालखी सोहळ्यात दररोज सायंकाळी सहा ते आठ कीर्तन होईल. रात्री आठ ते साडेनऊ यावेळेत महाप्रसाद होणार आहे. दातली (ता. सिन्नर) येथे मंगळवार दि. २५ जूनला दुपारी पहिले गोल रिंगण, ८ जुलैला कर्जतच्या धांडेवस्तीवर उभे रिंगण आणि परत १३ जुलै दगडी अकोले भागात गोल रिंगण होणार आहे.
दगडी अकोले येथील रिंगण सोहळा पार पडल्यानंतर पालखी ११ जुलै सकाळी ७.३० जेऊर शेलगाव वांगी मार्गे कंदर येथे सायंकाळी ५ वा.मुक्काम
१२ जुलै सकाळी ७.३० कंदर वेणेगाव दगडी अकोले सायंकाळी ५ मुक्काम.
१३ जुलै सकाळी ७.३० दगडी अकोले परिते, गोल रिंगण करकंब सायंकाळी ६ मुक्काम.
१४ जुलै रोजी सकाळी ७.३० करकंब मार्गे पांढरीची वाडी स.११ वा. मुक्काम.
१५ जुलै रोजी सकाळी ७.३० पांढरीची वाडी गुरसाळे-धावा आरती, चंद्रभागा स्नान चिंचोली सायंकाळी ७ मुक्कामी.
१६ जुलै सकाळी १०.३० चिंचोली इसबावी, वाखरी सोहळा पंढरपूर दुपारी
१६ जुलै ते २० जुलै पंढरपूर येथे आषाढी एकादशीचा सोहळा होईल.
त्यानंतर पालखी सोहळा त्र्यंबकेश्वरकडे प्रस्थान करेल.
