नाशिक शहरांसह अनेक तालुक्यात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी… !
द्राक्ष व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटाका ...

वेगवान नाशिक / भाऊसाहेब हांडोरे
सिन्नर ,दि : 2 एप्रिल — नाशिक सह जिल्ह्यातील ग्रामीण भागात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने सर्वसामान्य चाकरमान्यांना फटका बसला आहे तर अचानक आलेल्या पावसामुळे शेतकरी वर्ग ची एकच धांदल उडाली होती. कारण सध्या उन्हाळा कांद्याच्या काढणीला जोर धरला होता त्यातच अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे. काढण्यात आलेले कांद्याच्या पिकांत पावसाचं पाणी शिरले व कांद्याचे पीक झाकून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना अशक्य झाले त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरले आहे. शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे तसेच द्राक्ष पिकाच्या वाढीवर परिणाम झाला असून त्यामुळे डावणी रोगाचा प्रादुर्भाव दिसून येताच शेतकरी वर्गाची चिंता वाढली आहे.
राज्यात सर्वत्र पावसाने झोडपले असतांनाच सिन्नर तालुक्यातील काही भागात पावसाचे आगमन झाले असून या अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. कारण वादळी वाऱ्यासह पावसाने सिन्नर शहरं धुतले असून सर्व चाकरमान्यांना ची फार मोठी परवडत झाले असल्याचे दिसून आले आहे. तालुक्यातील पुर्व भागात विजेचा कडकाडाट व ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष बागायतदार शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत.
