नाशिक जिल्ह्यात गारपीट, महाराष्ट्रात पावसाचा कहर
नाशिक जिल्ह्यात गारपीट, महाराष्ट्रात पावसाचा कहर

वेगवान नाशिक /एकनाथ भालेराव
नाशिक/ दिनांक :12 एप्रिल/ हवामानात झालेल्या बदलामुळे नाशिक जिल्ह्यात अनेक तालुक्यात आज वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला.
नाशिक जिल्ह्य़ात परिसरातील काही गावांमध्ये हरबऱ्याच्या आकाराच्या गारांचा काही मिनिटे वर्षाव झाला. यामुळे नागरिकांची एकच धांदल उडाली.
वादळामुळे कांदा, कांदा बियाणे डोंगले नुकसान झाले आहे. तालुक्यातील शेतकर्यांची मोठी धांदल उडाली आहे.
पावसाचा अंदाज वर्तविण्यात आल्याने अगोदरच कांद्याचे दर कोसळलेल्या शेतकर्यांवर अवकाळीचे ‘ढग’ दिसत आहेत. कांदा काढनि सुरू असून,कांदा चाळीत साठवणूक सुरू असून शेतकर्यांमधील चिंता वाढली आहे. अवकाळी पाऊस, गारपीट वार्यामुळे शेती पिकांना मोठा फटका बसला आहे.
जिल्ह्यात बहुतांशी भागात गावरान कांदा काढणीला सुरवात झाली आहे, तर जिल्ह्यात काही ठिकाणी उशिरा पेरण्या झालेला गहूही सोंगण्याचे काम सुरू आहे. अशातच अचानक वातावरणात झालेल्या अचानक बदलामुळे शेतकर्यांची धाकधूक वाढली आहे.
बाजारात कांद्याचे भाव गडगडल्याने शेतकर्यांमध्ये चिंता व्यक्त करण्यात येत होती. त्यातच अवकाळीचे संकट समोर ठाकल्याने शेतकर्यांच्या चिंतेमध्ये वाढ झाली आहे.
जिल्ह्यात बहुतांशी कांदा हा काढणीला आलेला आहे, तर काही भागात कांदा काढून शेतातच पडलेला आहे. उशिरा पेरण्या झालेल्या गव्हाच्या सोंगणीचे काम सुरू असून, अवकाळी पाऊसाने कांद्याबरोबरच इतरही पिकांचेही नुकसान होणार आहे. सोसाट्याचा वारा व अवकाळी पाऊस गारपीट मुळे शेती पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
काढलेला कांदा चाळीत टाकण्यासाठी धावपळ
शेतकर्यांची सुरू झाली आहे.
नाशिक जिल्ह्यात अनेक तालुके कांद्याचे आगार म्हणून ओळख निर्माण करत आहे. लाल, रांगडा, गावरान कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात येत असते. नाशिक जिल्ह्य़ातील अनेक तालुक्यातील शेतकर्यांचे संपूर्ण आर्थिक गणित कांद्याच्या उत्पादनावरच ठरलेले आहे.
,,,,,,,,,,,,,, ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
सुमारे सहा एकर गावरान कांदा काढणीला आहे. कांद्याचे रोप, शेतीची मशागत, खुरपणी, औषधांची फवारणी, खते, मजुरी यासाठी सुमारे चार लाख रुपये खर्च झाला आहे. आजच्या बाजारभावात झालेला खर्चही वसूल होणार नाही.
,,,,,,न्यानेस्वर भालेराव
कांदा उत्पादक शेतकरी सायगाव ता येवला

वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी,लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान न्यूज येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम,शेती, उद्योग, खेळ,बीजनेस विषयातील बातम्यांमध्ये