नाशिक ग्रामीणशेती
नवसाला पावणाऱ्या श्री काल भैरवनाथाच्या मंदिरात भाविकांची गर्दी… यात्रा उत्सव संपन्न
आज टांगा शर्यर्ती व कुस्त्यांचे आयोजन..

वेगवान नाशिक / भाऊसाहेब हांडोरे
सिन्नर. : दि , 12 एप्रिल — नवस फेडण्यासाठी भक्तांची मांदियाळी —
[११/४, ७:१३ म.उ.] BHAUSHAB R, HANDORE.. Weg: …. नवसाला पावणाऱ्या श्री, काल भैरवनाथाच्या पावन भूमीत दर्शनासाठी लोखो भक्तांची गर्दी …… तालुक्यातील पुर्व भागात प्रसिद्ध असलेल्या शहा गावचे जागृत देवस्थान श्री, काळभैरवनाथ महाराज यांच्या यात्रा उत्सव दरवर्षी चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो. …
यानिमित्ताने शहा पंचक्रोशीतील हजारो भाविक आपल्या नोकरी व व्यवसाय.निमित्त पुणे, मुंबई. नाशिक औरंगाबाद. तसेच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात वास्तव्यास असलेले भुमि पुत्र आपल्या कुटुंबातील सर्व सदस्य,नातेवाईक यांना या यात्रा उत्सवात सहभागी होण्यासाठी दोन दोन दिवस गावाकडे येऊन श्री, काळभैरवनाथ महाराज यांच्या मिरवणूक. पालखी सोहळ्यात सहभागी होऊन यात्रा उत्साह साजरा करतात. ….
….. यात्रेच्या आदल्या दिवशी परिसरातील प्रत्येक कुटुंबाल एक व्यक्ती दहा बारा किलोमीटर अंतरावर असलेल्या चासनळी . मंजूर .माहेगाव येथुन गोदावरीचे पाणी आणले जाते, विशेष म्हणजे गंगेचं पाणी आणणारी व्यक्तीने पु-या खाऊन च पाणी आणावे अशी येथील प्रथा आहे. ….
तर दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता गंगेच्या पाणयाची भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात येते या मिरवणुकीत ” गळवंती ” हे या रथाचे खास वैशिष्ट्ये आहेत. मिरवणूक पाहण्यासाठी परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात व दुपारी बारा वाजता श्री, काळभैरवनाथ महाराज यांना गंगास्नान घातले जाते.यावेळी मंदिराचे पुजारी गणेश व कैलास श्रीमंत ( गुरव ) हे प्रथम पाणी घालतात व नंतर गावकऱ्यांना प्रवेश दिला जातो.. दुपारी चार वाजता श्री काळभैरवनाथ महाराज यांच्या मुर्तीची रथावर भव्य मिरवणूक काढण्यात येते या वेळी प्रत्येक घरातील महिला श्री कालभैरव नाथ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येत …..
या दरम्यान श्री कालभैरव नाथ यांना नवस फेडण्यासाठी दुपारपासून तर संध्याकाळ सहा वाजेपर्यंत महिला व भाविक भक्त आपला नवस वाजतगाजत पुर्ण करतात.. घरापासून ते मंदिरापर्यंत लोटांगण . पायघड्या घालत येत असतात.. संध्याकाळी परिसरातील सर्व भागांतून भाविक भक्त दर्शनासाठी गर्दी करतात.. यानंतर रात्री उशिरा शोभेची दारू उडवली जाते. शोभेची दारू पाहण्यासाठी तालुक्यातुन अनेक ठिकाणी लोक येऊन यात्रेची शोभा वाढवतात.. त्यानंतर रात्रभर लोकनाट्य तमाशा दाखवला जातो. दुसऱ्या दिवशी घोडा , बैल यांची टांगा शर्यर्ती भरविण्यात येत आहेत.. तसेच कुस्त्याची दंगल आयोजित करण्यात आली होती..
[११/४, ७:१ Weg: यात्रेच्या निमित्ताने श्री, कालभैरव नाथ मंदिरांसह गावातील प्रत्येक मंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. याप्रसंगी भरतपुर व लक्षमणपुर येथील लोककलावंत यांच्या लोककला सादरीकरण करण्यात येत परंतु हे कलावंत सजलेल्या रथावर आरूढ होऊन आपली कला सादर करून उपस्थितांची मने जिंकुन घेतात हे यात्रेची पंरपरा वर्षे नु वर्षे चाललेल्या या प्रथेला नागरिक मोठ्या उत्साहात साथ देतात.
