नाशिक जिल्ह्यातील काही तालुक्यांना गारपिटीचा तडाखा ,,,
कांदा व द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात,,, तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी

- वेगवान नाशिक / भाऊसाहेब हांडोरे
सिन्नर, दि : 13 एप्रिल — नाशिक जिल्ह्यातील काही तालुक्यांना गारपिटीचा तडाखा बसला आहे तर अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची जोरदार हजेरी लावली आहे , सिन्नर तालुक्यातील पुर्व भागात विजेचा कडकाडाट व सुसाट वादळी वाऱ्यासह पावसाने काही गावांना धुतले असून पंचाळे , शिंदेवाडी या परिसरात चक्क गारांचा पाऊस झाला असून अचानक आलेल्या पावसामुळे शेतकर्याची एकच तारांबळ उडाली कारण उन्हाळ कांद्याच्या काढणीला जोरदार सुरुवात झाली. अनेक ठिकाणी कांदा काडुन कापणी चालू होती परंतु अचानक आलेल्या गारपिटीने शेतातील कांदा तसाच पडून होता त्यामुळे कांद्याचे पीक खराब होण्याची भीती निर्माण झाली आहे. तर तोडणीस आलेल्या द्राक्षाच्या पिकाच्या फुगवणीवर परीनाम दिसुन लागला. गारपिटीने द्राक्ष बागायतदार संकाटात सापडलेले असून संबंधित विभागाने त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सर्व स्तरातून केली जाते आहे.
मागील काही दिवसांपूर्वी सिन्नर शहरा सह ग्रामीण भागात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने सर्वसामान्य चाकरमान्यांना व अचानक आलेल्या पावसामुळे शेतकरी वर्ग ची एकच धांदल उडाली होती. कारण सध्या उन्हाळा कांद्याच्या काढणीला जोर धरला होता त्यातच अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे.
राज्यात सर्वत्र पावसाने झोडपले असतांनाच सिन्नर तालुक्यातील काही भागात पावसाचे आगमन झाले असून या अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. कारण वादळी वाऱ्यासह पावसाने सिन्नर शहरं धुतले होते .सर्व चाकरमान्यांना ची फार मोठी परवडत झाले असल्याचे दिसून आले होते.. तालुक्यातील पुर्व भागात विजेचा कडकाडाट व ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष बागायतदार शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत.या वर्षे नु वर्षे चाललेल्या या आपत्तीतून बाहेर निघत तोच दुसरं अस्मानी संकट उभे ठाकले आहेत त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे.. यांवर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केला जाणे गरजेचे आहे.
मागील वर्षी अतिवृष्टी व गारपिटीने सोयाबीन.मका . बाजरी ज्वारी व हरभरा पिकाचे मोठे नुकसान झाले होते परंतु अद्याप कोणतीही मदत माळाली नाही.. सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचे नुकसान झाले त्याचे पंचनामे करून सुद्धा अजुन एक रुपया हि मिळाला नाही.. त्यामुळे सध्या तरीसुद्धा शासन याकडे गांभीर्याने विचार करील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे .
