नाशिक क्राईम

या तालुक्यातून अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या अटक

नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीसांची कामगिरी


वेगवान नाशिक/Wegwan Nashik –

 विशेष प्रतिनिधी,18 जानेवारी- 

नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी आदेशीत केल्याप्रमाणे, जिल्हयातील अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन तसेच सराईत गुन्हेगारीस प्रतिबंध होण्यासाठी सत्वर कारवाई करण्यात येत आहे

त्यानुसार आज दिनंक १८/०१/ २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे  यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार MIDC सिन्नर पोलीस ठाणे हद्दीत एक संशयीत इसम अवैधरित्या घातक अग्नीशस्त्रे बाळगुन काहीतरी गुन्हा करण्याचे उद्देशाने फिरत असल्याची बातमी मिळाली. त्याप्रमाणे स्थागुशावे पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी गुळवंच, ता.सिन्नर परिसरातुन संशयीत इसम नामे राहूल तुळशीराम गुरकूले, वय २६, रा. दगडवाडी, गुळवंच, ता. सिन्नर, जि.नाशिक यास ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेले इसमाची अंगझडती घेतली असता त्याचे कब्जात १ देशी बनावटीचे पिस्टल व १ जीवंत काडतूस मिळून आले. सदर इसम हा विनापरवाना बेकादेशीररित्या घातक अग्निशस्त्र  कब्जात बाळगतांना मिवून आला असून त्यांचेविरूध्द MIDC सिन्नर पोलीस ठाणेस भारतीय हत्यार कायदा कलम ३/ २५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे यातील आरोपी राहुल गुरकुले याचेवर यापु्ी MIDC सिन्नर पोलीस ठाणेस गंभीर दुखापत व म.पो का.क. १२२ प्रमाणे गुन्हे दाखल आहेत,

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्ष विक्रम देशमाने व अपर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शन बे सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, सपोनि संदेश पवार, सपोउनि नवनाथ सानप, पोलीस अंमलदार विनोद टिळे, प्रकाश कासार, राहुल साळ्वे, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम यांचे पथकाने सदरची कारवाई केली आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!