नाशिक क्राईम

नाशिक मधील एकाला बलात्कार प्रकरणी 20 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा


वेगवान नाशिक 

Nashik Crime News :  नाशिक जिल्हा न्यायालयाने २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. सदरची घटना जुलै २०२३ मध्ये घडली होती. पंचवटीतील पाथरवट लेन येथे शेजारी राहणाऱ्या अवघ्या ६ वर्षीय चिमुकलीला बिस्कीट व मोबाईलवर कार्टून दाखविण्याचे आमिष दाखवून तिच्यावर लैगिंक अत्याचार करणाऱ्या नराधमाला (Nashik Crime 20 years of hard labor for accused due to fast track court Abusing minor girl marathi news)

प्रकाश आबासाहेब ठोंबरे (४३, रा. पाथरवट लेन, पंचवटी) असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पीडित चिमुकल्याच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार, १४ जुलै २०२३ रोजी आरोपी प्रकाश याने ६ वर्षांच्या चिमुकलीला बिस्किट देण्याचे व मोबाईलवर कार्टून दाखविण्याचे आमिष दाखवून त्याच्या घरात बोलाविले. त्यानंतर नराधम प्रकाश याने तिच्यावर लैंगिंक अत्याचार केले होते. याप्रकरणी पंचवटी पोलिसात पोस्कोअन्वये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदरील गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक मिथून परदेशी, अंमलदार श्रीकांत कर्पे यांनी केला होता. आरोपीविरोधात सबळ पुरावे संकलित करून सप्टेंबर २०२३ मध्ये जिल्हा न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. त्यानुसार विशेष सत्र न्यायालयाच्या न्यायधीश श्रीमती पी.व्ही. घुले यांच्यासमोर खटला चालला.

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता श्रीमती लिना चव्हाण यांनी साक्षीदार व पंचांची साक्ष घेतली. यात आरोपीविरोधात आरोप सिद्ध झाल्याने न्यायालयाने आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास व ५० हजारांचा दंड, दंड न भरल्यास १ वर्षे साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. पंचवटीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी पैरवी अधिकारी मधुकर पिंगळे यांच्या मदतीने विशेष पाठपुरावा केला.

फास्ट ट्रॅक कोर्ट

चिमुकलीवरील अत्याचाराचा खटला जिल्हा न्यायालयातील विशेष सत्र न्यायालयामध्ये फास्ट ट्रॅकवर चालविण्यात आला. यासाठी पंचवटीचे विशेष पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे दोषारोप पत्र दाखल झाल्यानंतर अवघ्या सात महिन्यात या खटल्याचा निकाल लागून नराधम आरोपीला न्यायालयाने कठोर शिक्षा सुनावली, यामुळे पीडित कुटूंबियांमध्ये न्याय मिळाल्याची भावना आहे.


Sahebrao Thakare

वेगवान ऑनलाईनमध्ये मुख्यसंपादक म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, पुण्यनगरी, पुढारी,अॅग्रोवन, टीव्ही ९ मराठी, पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान नाशिक, इंडिया हिंदी न्यूज, बीजनेस बातम्यांचे संपादकीय म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम,शेती, उद्योग, खेळ,बीजनेस विषयातील बातम्यांमध्ये हातखंडा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!