महाराष्ट्र मध्ये ढगाळ वातावरण, पाऊस पडणार?

मुंबई, ता. 15 – उत्तर भारतामध्ये सक्रिय असलेला WD(western disturbance) पश्चिमी विक्षोभ व बंगालच्या उपसागराकडून येणारे बाष्पयुक्त वारे यांच्या प्रभावामुळे महाराष्ट्र मध्ये ढगाळ वातावरण तयार झाले आहे. या ढगाळ वातावरणामुळे महाराष्ट्रात पाऊस पडणार का याची शंका शेतकरी वर्गामध्ये निर्माण झालेली आहे.
दिल्ली हरियाणा पंजाब या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दाट धुक्याची चादर पसरली आहे दिवसभर लोकांना रस्ता पण दिसत नाही आज धुक्यामुळे मध्य रेल्वेच्या दोन डझन पेक्षा जास्त गाड्या पाच ते सात घंटे उशिराने धावत होत्या.
या बाष्पयुक्त वाऱ्याचा प्रभाव यामुळे चाकर मानें वरती पडला आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी जोरदार वारे वाहत असल्यामुळे आकाशामध्ये मोठ्या प्रमाणात ढगांनी गर्दी केली.
दिनांक 16 व 17 जानेवारीला सुद्धा मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र व पश्चिम महाराष्ट्र मध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे
मागील 11 जानेवारीपासून राज्यात ढगाळ वातावरण होत आहे व ते पुढे वरील तारखा प्रमाणे राहील.
दिनांक 16 व 17 जानेवारीला थंडीचे प्रमाण कमी राहील दिनांक 18 19 जानेवारी पासून ढगाळ वातावरण कमी होऊन थंडीमध्ये सामान्य वाढ होईल.
पाऊस पडण्याची शक्यता नाही असे तरी अपडेट येत आहे.
